Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

फलदायी आरोग्य

जमाना इन्स्टंट फूडचा असला, तरी उत्तम आरोग्यासाठी समतोल आहार घेणं आवश्यक असतं. या समतोल आहारात फळांना विसरून चालणार नाही. फळांमुळे शरीराला फायबर

मिळून पचन संस्थेचं काम सुधारतं.

आरोग्य राखण्यासाठी समतोल आहार आवश्यक असतो. योग्य आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखता तर येतंच शिवाय, शरीरात उत्साह आणि चैतन्यही भरून राहतं. समतोल आहारात फळांचा समावेश करणंही तेवढंच आवश्यक आहे. फळांमुळे शरीराला फायबर मिळतं. परिणामी, पचन संस्थेचं कार्य सुरळीत चालू राहतं. आरोग्यवर्धक अशा फळांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सफरचंद

पोषणमूल्य : यात व्हिटॅमिन सी, आर्यन, पोटॅशियम, सोडिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि सल्फर असतं.

फायदे : सफरचंद आणि सफरचंदाचा ज्यूस शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडतात. आतड्यांना झालेला संसर्ग, सूज, संधीवात, डायरिया आणि अॅसिडिटी यासारख्या आजारांमध्ये याचा फायदा होतो. 'अॅन अपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' म्हणतात ते याचमुळे. एका अख्ख्या सफरचंदात (सालीसकट) ३.६ ग्रॅम फायबर असतं. म्हणजे रोजच्या आहारात आवश्यक फायबरच्या प्रमाणापैकी १७ टक्के फायबर त्यातून मिळतं.

केळं

पोषणमूल्य : यात पोटॅशियम, सोडियम, क्लोरिन, आयर्न, ग्लुकोज, अमिनो अॅसिड, फॉलेट ही आवश्यक पोषणदव्य आहेत.

फायदे : मलावरोध आणि अल्सर यासाठी केळं खाणं फायद्याचं ठरतं. यामुळे शीरा, स्नायू तसंच पचन संस्था सुधारतं. पोटॅशियम आणि साखर असल्याने शरीराला एनजीर् मिळते, शरीराचं पोषण होतं.

एका मोठ्या केळ्यातून साधारण १०० कॅलरीज मिळतात. इतर फळांपेक्षा यात गराचं प्रमाण अधिक आणि रसाचं प्रमाण कमी असतं. म्हणूनच खूप दमलंभागलं असताना एक केळं खाल्लं, तर शरीरात एनजीर् निर्माण होऊन बरं वाटतं.

पपई

पोषणमूल्य : व्हिटॅमिन 'ए' आणि 'ई', सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शिअम, कॉपर, फ्रुकटोज आणि फॉलिक अॅसिडयुक्त

फायदे : पपई खाल्ल्याने पचनकार्य सुधारतं. कॅन्सर, हृदरोग आणि मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. आतड्यांच्या आजारातही हितकारक आहे. मलावरोधाचा त्रासही पपई खाण्याने कमी होतो.

अननस

पोषणमूल्य : व्हिटॅमिन 'बी', 'सी' आणि 'ई', फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, फॉलिक अॅसिड आणि सुक्रोजयुक्त

फायदे : अननस खाल्ल्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं. जेणे करून शरीरातील उत्सर्जक घटक बाहेर पडतात. रक्त शुद्धीकरण, रक्ताभिसरण सुधारतं. तसंच रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते. पचनसंस्थेचं काम सुधारतं.

नमिता जैन
- क्लिनिकल एक्सरसाइज,
लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्स्पर्ट http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6978230.cms

No comments:

Post a Comment

Visit Our Page