Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, November 27, 2010

मधुमेह

डॉ. नितीन पाटणकर
जगभर जेव्हा मधुमेहाला ‘गोड लघवीचा रोग’ या संज्ञेत बसवलं जात होतं, त्या काळात सुश्रुताने मधुमेह व मेदरोगाचा संबंध ओळखला होता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मधुमेद हा शब्द वाचताना सुरुवातीला असं वाटतं की मधुमेह लिहिताना शुद्घलेखनाची चूक होऊन ‘ह’ चा ‘द’ झाला असावा. अमेरिकेत व युरोपमध्ये अंदाजे पंधरा वर्षांपूर्वी असं प्रकर्षांने जाणवू लागलं की स्थूलतेचं प्रमाण खूप वाढतंय. खास करून तिशीच्या आत व कधी नव्हे ते लहान मुलांच्यात स्थूलता खूप वाढत चालली आहे. साधारण २००३ साली, असंही दिसून आलं की मोठय़ा वयात होणारा मधुमेह ज्याला टाइप टू मधुमेह म्हणतात. हा या वयाने लहान परंतु स्थूल लोकांच्यातही वाढू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आठ ते दहा वर्षांच्या स्थूल मुलांच्यात हा टाइप टू डायबेटीस आढळू लागला.
वैद्यकीय संशोधनात असंही लक्षात आलं की, स्थूलता व मधुमेह यांची युती ही राहू केतूंच्या युतीसारखी म्हणजे, दोघांच्या स्वतंत्र किंवा एकटेपणी मिळणाऱ्या फळांच्या बेरजेपेक्षा अधिक फळ देणारी . थोडक्यात दोन अधिक दोनचे उत्तर पाच किंवा सात येईल, असं हे गणित. म्हणून त्यांनी या युतीला diabesity म्हणजेच डायबेटीस अधिक ओबेसिटी असं नाव दिलं. त्याचं मराठीत भाषांतर करताना ‘मधुमेद’ हा शब्द सुचला व चपखल बसला देखील.
भारतासंदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मधुमेदाच्या गणितात आशियाई लोकांच्या दुष्परिणामांची बेरीज पाचाऐवजी सात येण्याचं प्रमाण जास्ती. म्हणूनच आपल्यासाठी मधुमेदाची ओळख जरा खोलात शिरूनच करून घेतली पाहिजे.
जगातल्या विविध संस्कृतींमध्ये प्राचीन काळापासून मधुमेदाची ओळख आहेच. सर्व भाषांत डायबेटीसचे भाषांतर हे लघवीतल्या साखरेच्या प्रमाणावरूनच झालेले आढळते. असं म्हणतात, की ज्या डॉक्टरने डायबेटीस हे नाव दिलं, त्याने रुग्णाच्या लघवीत बोट घालून ती चाखून बघण्याचं धाडस दाखवलं. पण गंमत अशी की त्याला anasmia होता म्हणजे कुठचेही वास येत नसत. आज, असं म्हटलं जातं की त्याला जर वास येत असता तर त्याला लघवीत साखर आहे हे कळलं असतं. तसंच लघवीत व श्वासात असणाऱ्या कीटोन्सचा (म्हणजे चरबीयोग्य प्रकारे जाळली न गेल्याने निर्माण होणारी द्रव्य) चा वास आला असता. इतकी वर्ष मधुमेहावरील संशोधन जे फक्त रक्तातल्या साखरेभोवती घुटमळत राहिले व राहिले नसते अधिक व्यापक झाले असते. त्याचवेळी सर्वाना चरबी, साखर व प्रथिने या सर्वाचा मधुमेहातील प्रभाव कळला असता.
एका माणसाला वास न येण्याचे किती दूरगामी परिणाम झाले बघा! आता कुठे डायबेसिटीची ओळख होऊ लागली आहे.
खरंतर सुश्रुताने मधुमेहाचं वर्णन करताना रुग्णाच्या लघवीस मुंग्या लागतात व मेदोरोग (स्थूलता) कमी केल्यास मधुमेहावर उपचारात मदत होते हे नमूद केले आहे. जगभर जेव्हा मधुमेहाला ‘गोड लघवीचा रोग’ या संज्ञेत बसवलं जात होतं, त्या काळात सुश्रुताने मधुमेह व मेदरोगाचा संबंध ओळखला होता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सुरुवातीस जेव्हा मधुमेद हा शब्द वापरात येऊ लागला. तेव्हा अनेक कर्मठ डॉक्टरांनी त्याला नाक मुरडली. त्याच्या मते मधुमेह व रक्तदाब हे दोन्ही आजार एकाच व्यक्तीत अनेकदा दिसून येतात, मग त्याला तुम्ही मधुदाब म्हणणार की काय? मग वैद्यकक्षेत्रात छान वादविवाद रंगले. शेवटी असं लक्षात आलं की मधुमेह की रक्तदाब जरी एकाच व्यक्तीत असले तरी ते एकमेकांना वाढवीत नाहीत. म्हणजे रक्तदाबामुळे मधुमेह वाढतो व मधुमेह वाढला की रक्तदाब वाढतो असे होत नाही. परंतु मधुमेदात मात्र या गोष्टी हमखास घडतात. म्हणजे मेद वाढला की मधुमेह बळावतो व मधुमेहावर उपचार करू द्यावेत तो मेद बळावतो. अशा रीतीने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होते. हे सर्व लक्षात आल्यानंतर मधुमेद (डायबेसिटी)या शब्दाला मान्यता मिळाली. आत्तापर्यंत या मधुमेदावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी तीन आंतरराष्ट्रीय परिषदा पण झाल्या. एक मजेची बाब म्हणजे हा शब्द स्वीकारावा की नाही यावरून तज्ज्ञांच्यात अगदी दोन गट पडून, दोन हात होऊनही, आंतरराष्ट्रीय संस्थांत फूट पडली नाही. हे मुद्दामहून सांगण्याचे कारण की अशी वेळ यायच्या आधीच आपल्याकडे मूळ संस्थेत फूट पडून दोन वेगवेगळ्या संस्था तयार झाल्या असत्या.
या मधुमेदाचं आणखी एक विशिष्ट स्थान वैद्यकक्षेत्रात आहे. मधुमेदाच्या उदयाआधी फक्त संसर्गजन्य रोगांच्या साथींविषयी अभ्यास व्हायचा. पण मधुमेदाच्या रुग्णांची संख्या इतक्या झपाटय़ाने वाढत गेली की या संसर्गजन्य नसलेल्या रोगांचीही साथ येऊ शकते हे तज्ज्ञांच्या लक्षात येऊ लागले. आता तर मधुमेह व मधुमेद हे आजार साथीप्रमाणे पसरतात व मग समाजात टिकून राहतात (attain endemic proportions) हे लक्षात आले आहे.
मधुमेदाच्या उदयाआधी फक्त संसर्गजन्य रोगांच्या साथींविषयी अभ्यास व्हायचा. पण मधुमेदाच्या रुग्णांची संख्या इतक्या झपाटय़ाने वाढत गेली की या संसर्गजन्य नसलेल्या रोगांचीही साथ येऊ शकते हे तज्ज्ञांच्या आले. आता तर मधुमेह व मधुमेद हे आजार साथीप्रमाणे पसरतात हेही सिद्ध झाले आहे.
मधुमेदामुळेच 'lifestyle disorder' जीवनशैलीमुळे होणारे आजार हा शब्दही खूप लोकप्रिय झाला. मधुमेदामुळेच junk food, fast food, trans fats इ. घातक गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
मधुमेदामुळे आजारांना मनोकायिक (psycho-somatic) परिमाणांसोबत सामाजिक परिमाण पण असते हे उघड झाले. मधुमेदावरील उपचारांचा प्रचंड खर्च लक्षात आल्याने तो टाळण्यासाठी काय उपाय करावेत यावर गांभीर्याने विचार होऊ लागला.
पाश्चिमात्य देशांत रोगांवरील उपचारांचा खर्च हा insurence द्वारा, सरकारी नियंत्रणांतून म्हणजेच प्रत्येकाच्या उत्पन्नातील गोळा केलेल्या वाटय़ातून होत असल्याने सर्वानाच या गोष्टीचे महत्त्व पटू लागले आहे. आपल्याकडे अजूनही उपचारांचा खर्च हा बहुधा स्वत:च्याच खिशातून होत असल्याने ‘कुत्ता जाने चमडा जाने’ असा लोकांचा भाव असायचा. पण आपल्याकडेही इन्शुरन्स कंपन्यांचं या उपचारांवरील खर्चामुळे नुकसान होऊ लागले आहे. मग प्रीमियम वाढायला लागले, व त्याची झळ इन्शुरन्स काढणाऱ्यांना जाणवू लागली आहेच. पुढच्यास ठेच मागचा शहाणा तसे पश्चिमेस ठेच, पूर्वेला शहाणपण असं व्हायला हवं. त्यासाठी मधुमेदावर खोलात जाऊन माहिती घ्यायला हवी. हे करतांना मधुमेहासंबंधी, मेदरोगासंबंधी व मधुमेदासंबंधी माहिती मिळेल.
मरण हे अटळ आहे. फटकन मरण्याला कोणीच भीत नाही. पण मधुमेह  आघात करतो. तो जीवन हिसकावून घेत नाही. तो माणसाला विकलांग करतो, परावलंबी करतो. त्यालाच आपण सर्वजण घाबरतो. म्हणून तर मधुमेदाची ओळख करून घ्यायची. ओळखीचा शत्रू नेहमीच बरा असतोwww.loksatta.com/lokprabha/20101029/arogya.htm.

No comments:

Post a Comment

Visit Our Page