Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

रक्तदान

पेशीयुक्त द्रवपदार्थामुळे रक्त बनलेले असते. या पेशी म्हणजे लाल पेशी (RBC) आणि (WBC) व प्लेटलेटस्‌ (Platelets) रक्ताच्या एकूण आकारमानापैकी ४५ टक्के असतात. उरलेला द्रव भाग हा प्लाझ्मा असतो.
विविध रूग्णांच्या गरजेनूसार प्रत्येक ‘पिंट’ दान केलेल्या रक्ताचे वेगवेगळ्या घटकांमध्ये वर्गीकरण करता येणे शक्य आहे म्हणून प्रत्येक ‘पिंट’ रक्त हे संजीवनी ठरू शकते. लाल रक्तपेशी या शरीरात प्राणवायु पुरवितात आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर काढून टाकतात. त्यांच्या योग्य त्या कार्यासाठी लाल रक्तपेशींचे नीट पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण पदार्थ म्हणजे लोह, मांसापासून, काळीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या, इ. पासून मिळू शकते.
लाल रक्तपेशी या बोन मॅरो मध्ये तयार होत असतात आणि त्यांच्या उत्पन्नाचा सामान्य दर हा १७ दशलक्ष पेशी प्रती सेकंद असतो. रक्त प्रवाहातील पांढऱ्या पेशी या संरक्षक पेशी असतात. त्या सूक्ष्म जंतूवर (बॅक्टेरीया) सूक्ष्म धमन्यामधून जाउन हल्ला करतात आणि त्यांचा नाश करतात. पांढऱ्या रक्त पेशी सुध्दा प्लेटलेटस, (Platelets) तयार करतात. ज्या रंगहीन पेशी असतात आणि यांचा तयार होण्याचा वेग हा लाल पेशींच्या दुप्पट असतो. पांढऱ्या रक्त पेशी बोन मॅरोमध्ये मेगाकायरोसाइटस च्या तुकड्यातून तयार होतात.
मेगाकायरोसाइटसचे मुख्य कार्य रक्तामध्ये गाठी निर्माण करून रक्तस्त्राव थांबविणे हे आहे. याशिवाय प्लेटलेटस (Platelets) रक्तवाहिन्या ‘लीकप्रूफ ठेवण्याचे कार्य करतात. प्लाझ्मामध्ये ९२ टक्के पाणी ,७ टक्के प्रोटीन्स, १ टक्के खनिज हार्मोन्स आणि एन्हाइम्स‍अव्हिटॅमिन्स असतात. प्लाझ्मा हा गामा ग्लोब्यूलीन, सीरम अल्ब्यूमिन, फायब्रिनोजिन आणी गाठी निर्माण करणार्‍या घटकांचा स्त्रोत आहे. Blood Bank

No comments:

Post a Comment

Visit Our Page