Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, May 18, 2011

आंबे

आंबे खा जपून...
पिवळ्याधम्मक आंब्याच्या प्रेमात पडला नाही, असा माणूस मिळणे विरळच. मे महिना आणि आंबा हे दोन्ही हातात हात घालून येतात. आंब्याची चव जिभेवर रेंगाळत
राहते आणि बस एक और... चा नारा बुलंद होतो. यात लहानांसोबत मोठ्यांचाही सहभाग असतो.

फळांच्या या राजाचे आहारात भरपूर उपयोगही आहेत. अ आणि क जीवनसत्वांचा मोठा सोत असलेला आंबा त्वचेवरील सुरकुत्या कमी करून ती तरूण ठेवतो. त्यात बी कॉम्प्लेक्स असल्याने त्वचा तजेलदार करतो. कैरीमध्ये अॅण्टि ऑक्सिडन्ट वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे अमृतचवीचा आंबा खाण्यात भरपूर फायदेही आहेत. अर्थात पदार्थ कितीही चांगला असला तरी अति तेथे माती होते.

आंब्यामध्ये भरपूर काबोर्हायड्रेट््स आणि कॅलरीज असतात. त्यामुळे पटकन वजनही वाढते. त्यामुळे वजनाबाबत कॉन्शस असलेल्या व्यक्तींनी फार आंबे खाऊ नयेत. आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनीही त्यापासून चार हात दूर राहिलेलेच चांगले. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खा. खूप आंबे खाल्ले की पोटही बिघडते.

आंब्याचा दिसून येणारा परिणाम म्हणजे शरीरावर येणारे उष्णतेचे फोड. आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. या फोडांना गंमतीत आंबे फुटले का, असेही म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा प्रकार अनेकदा होतो. या फोडांना खाजही सुटते. याचा सरळ उपाय म्हणजे आंबे कमी करणे असा असला तरी केवळ मोसमात मिळणाऱ्या या फळांच्या राजाचा मोह सुटत नसतो, हेदेखील खरे. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अॅलजीर् लक्षात येत नसल्याने तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वषीर् अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नका. एवढे करूनही फोड आलेच तर त्यावर गरम टॉवेल लावा. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकतील.

काही वेळा आंब्याच्या सालीमधील चिक लागून ओठाशेजारचा भाग तसेच गालावर रॅशेस येतात. हा प्रकार दुमिर्ळ असला तरी त्याबाबतही काळजी घेतली पाहिजे. आंबा नीट धुवावा. सालासकट आंंबा चोखून खाणे टाळावे. तसेच रॅशेस आले तर त्यावर मध लावावा. खूपच अॅलजीर् होत असेल तर आंबे टाळणे चांगले. अर्थात ज्यांना अशी अॅलर्जी असेल त्यांच्यासाठीच हे सारे आहे. इतरांनी आंब्याचा आनंद लुटायला हरकत नाही.



http://www.facebook.com/drjiteshpathak

वैद्य . जितेश पाठक
धुले 
  • 8275007220
  • 9960507983

No comments:

Post a Comment

Visit Our Page