Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 14, 2015

आम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी

आम्लपित्त / हायपर अ‍ॅसिडीटी

आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी आम्लपित्त ही व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकते. जर पथ्ये पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते.
***** आम्लपित्ताची सामान्य लक्षणं
तीव्र वेदना डोकेदुखी,
घशाशी होणारी जळजळ,
तोंडाला आंबट,
कडवट पाणी येणं,
उलटीची भावना होणं .
काहीवेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणं ही देखील तक्रार असते.
आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते.
या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात. अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे.
***** आम्लपित्ताची कारणे :
* अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं,
* अतिशय आंबट खाणं,
* अतिप्रमाणात चहापान करणं,
* मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान,
* तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण,
* मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण,
* अतिजागरण,
* जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा,
* भूक लागलेली असताना आहार न घेणं,
* मानसिक चिंता
* आम्लपित्ताची लक्षणे :
* तीव्र वेदना डोकेदुखी,
* घशाशी होणारी जळजळ,
* तोंडाला आंबट, कडवट पाणी येणं,
* उलटीची भावना होणं
* आंबट व करपट ढेकर येणं
* हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
* डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
* शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
* अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
* डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
* तोंड येणे.
* नाकातून रक्‍त येणे.
* लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
* अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे. अंगाला खाज सुटणे.
* निरुत्साही वाटणे.
* यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर पुढे केस गळणे, अकाली पांढरे होणे यासह यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात.
* आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते.
* उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरं वाटतं. काही जणांना तर घशात बोटं घालून उलटी करावी लागते.
* या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात.
* अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे. म्हणून आम्लपित्ताकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे.
****** प्रतिबंधात्मक उपाय :
* आपली दिनचर्या नियमित ठेवावी.
* आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे.
* व्यसनांपासून सदैव दूर राहावे.
* उन्हात जाताना छत्री न्यावीच.
* ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनी रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे,
* काही उपचार हे तात्पुरता दिलासा देणारे असतात, तर काहींचे दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असू शकतात. उदाहरणच द्यायचं तर सोडय़ाचं देता येईल. आम्लपित्ताचा त्रास होऊ लागला की रोग्यांना ‘सोडा’ पिण्याची सवय असते. सोडय़ामुळे वाढलेल्या पित्ताचं तात्पुरतं उदासीनीकरण होऊन तात्पुरतंच बरं वाटतं. पण ही सवय लावून घेणं चांगलं नाही. यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणं कसं टळेल, याकडेच अधिक लक्ष पुरविलं पाहिजे.
***** घरगुती उपाय
* पाणी प्या : पोटात दुखू लागलं किंवा खाल्ल्यावर त्रास होऊ लागला तर एक ग्लास कोमट पाणी प्यायलं पाहिजं. दिवसभरात कमीत कमी दहा ग्लास पाणी पोटात जाणं आवश्यक आहे.
* आलं घातलेला चहा करून पिता येईल. कपभर चहात एक चमचा ताजं आलं घालून तो चहा घेणं फायद्याचं ठरतं.
* छोटी दालचिनी किंवा २-३ वेलदोडे खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका : झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवण झालं असलं पाहिजे.
* ताजी चिरलेली मिंटची पानं गरम उकळत्या पाण्यात घालून काही वेळानंतर ते पाणी जेवणानंतर प्या.
* लवंग चोखल्याने नैसर्गिकरित्या पित्त कमी होते.
* जेवानंतर बडीशेप खाणं उत्तम. त्यात अनेक पाचक घटक असल्याने जेवणानंतरच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत नाही.
* आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो.
* कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते.
* साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे,
* फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे,
* उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा पित्त संतुलनास मदत करते.
* तांदूळ, गहू, मूग ही धान्यं, दुधीभोपळा, पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात.
भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे;
* भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे,
* हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.
* शेंगदाणे किंवा कूट घातलेले पदार्थ जमल्यास खाऊ नयेत किंवा कमी खावेत.
* स्थूल असल्यास आधी वजन कमी करा. व्यायाम करा.
* पोट रिकामे असेल तेव्हा आम्लपित्ताची लक्षणे वाढतात. म्हणून सामान्यतः दर तीन तासांनी थोडा का होईना आहार घेणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास होत असेल तर त्या काळात आंबट, तिरवट, आंबविलेले पदार्थ वर्ज्य करावे.
* पित्ताचा त्रास होत असेल तर लाल मटण खाणं कमी केलं पाहिजे. त्याऐवजी चिकन किंवा मासे खाल्ल्याने पित्ताचा धोका टाळता येतो.
* चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद. / दरदिवशी फक्त दोनच कप घेऊन कॅफेनच्या सेवनावर नियंत्रण ठेवता येईल.
* मेथी, वांग संपुर्ण बंद
* शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी.
* कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण.
* प्रत्येक घास नीट चावून खा.
* शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो
* उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी.
* आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय.
* vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream
* नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी )
* तूर डाळीने पित्त होते. त्याऐवजी मूग डाळ वापरावी.
* सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो.
* आहारात पचायला हलके असणारे व त्याचबरोबर चवीला गोड, तुरट, कडू चवीचे लागणारे पदार्थ घ्यावेत. हे सर्व रस पित्त कमी करणारे आहेत.
* जास्त तिखट, मसालेदार, आंबट पदार्थ वापरू नयेत.
* खूप पोट भरेल एवढे जेवू नये. जेवल्यानंतर झोपू नये.
* जास्त मीठ क्षार असणारे असे लोणची, पापड इ. पदार्थ टाळावे.
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे दही अजिबात खाऊ नये. दही शरीरावर उष्ण परिणाम करणारं व त्यामुळे पित्ताचा त्रास वाढविणारं आहे म्हणून ते पूर्ण बंद करावं.
* तळलेले पदार्थ, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.
* विरुध्द अन्नाचा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा, फास्ट फूडचा, बेकरीच्या पदार्थांचा, हवाबंद डब्यातील पदार्थांचा, कोल्डींक्सचा त्याग करावा.
* आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो
* आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो.
* आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद
* २-३ आमसुलं/कोकमं खावी किंवा त्याचं सरबत घ्यावं अथवा लिंबाच्या रसातले आल्याचे तुकडे खावे (थोडे कमी कारण आलं उष्ण असतं)
* पित्तावर तुळशीची पाने चघळणे, लवंगा चघळणे किंवा गुळाचा खडा चघळून खाणे या उपायांचाही उपयोग होतो.
* मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही पथ्यकर असते
* शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो.
* Gelucil, हे तर आहेच
* Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे.
***** आहार योजना -
1) पहाटे - एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यात एक चमचा मध टाकावा आणि हे पाणी प्यावे. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने एक चमचा (तीन ग्रॅम) गव्हांकूराचे चूर्ण एक ग्लास साध्या पाण्यासोबत घ्यावे. यानंतर साधारण एक तास काही खावू नये.
2) सकाळी ८ वाजता - २ केळी, १ गालास संत्र्याचा रस, १ फुलका आणि घरचे लोणी अगर एक खाकरा, चार ते पाच खजूराच्या बिया आणि सुंठ टाकून केलेला एक कप चहा घ्यावा.
3) दुपारचे जेवण - जेवणापूर्वी एक कप कोकम सरबत आणि थोडेसे गूळ - आले घ्यावे. जेवणात कोंडायुक्त कणकेचे फुलके, एक पालेभाजी, एक फळभाजी, कोशिंबीर, कवठाची चटणी, मुगाचे वरण अगर मोड आलेल्या मुगाची भाजी, हातसडीचा भात, जेवणाच्या शेवटी एक कप गोड ताक आणि जेवणानंतर थोडीशी आवळा सुपारी
4) सायंकाळी ४ वाजता - एक सफरचंद, तीन ते चार बदामबिया, दोन ते चार अंजीरे आणि अर्धाकप आल्याचा चहा घ्यावा.
5) रात्रीचे जेवण - हे दुपार प्रमाणेच असावे. बदल हवा असेल तर हिरव्या भाज्यांचे सूप, ग्रीन सॅलेड, दूध पोळी आणि थोडी मुगाची खिचडी घ्यावी.
6) झोपताना - एक ग्लास थंड दूध घ्यावे.
या प्रमाणे आहार योजना केली तर पित्ताच्या विकारावर आपण विजय मिळवू शकतो.
**** अपचन
* सकाळी उठल्यानंतर जर दोन कप उकळून कोमट केलेले पाणी घेतले तर मल पातळ होऊन rectum मध्ये येते. आपल्या instestine मधून मल खाली rectum पर्यंत पोचायला पाहिजे मग constipation होत नाही.
* तसेच रात्री झोपताना लगेच जेवन झाल्याझाल्या झोपू नये. थोडे चालावे फ़िरावे कुणाशी बोलावे.
* भरपूर फ़ायबर असलेले फ़ळ खाल्ले तर constipation चा त्रास कमालीने कमी होतो. जसे संत्री जर आतल्या सालीसकट खाल्ले तर शरीराला भरपूर प्रमाणात फ़ायबर मिळते आणि त्यामुळे अन्न भरभर खाली उतरते.
* तसेच टरबुज, चिक्कु, बटाट्याची साल ह्या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात फ़ायबर असते.
* मुगाची डाळ पचायला सोपी आणि त्यातील टरफ़लांमध्येही भरपूर फ़ायबर असते.
* जेंव्हा आपण खूप मैदा असलेले पदार्थ खातो त्यावेळी constipation घडते.
* रात्रीच्या जेवनानंतर सहसा दुध घेणे टाळावे. दुधासाठी सकाळची वेळ खूप चांगली असते. दुध घ्यायचेच झाले तर चरबीयुक्त दुध न घेता skimmed milk घ्यावे.
* तसेच पापड लोणची जेवनातून काढून टाकावी. रात्रीच्या वेळी भात न खाता चपाती खावी.
***** शरीर थंड ठेवणार्‍या / थंड गुणाच्या पाककृती
* खीर
साहित्य : सुवासिक तांदूळ, दूध, खडीसाखर, वेलदोडे, तूप.
गायीच्या तुपावर तांदूळ चांगले गुलाबी होईपर्यंत परतावे व नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे. दूध चांगलं गरम करून त्यात हे तांदूळ मिसळावे व शिजेपर्यंत खीर उकळून घ्यावी. खीर गुणकारी व्हावी या दृष्टीनं त्यात खडीसाखर बारीक करून घालावी. स्वादासाठी वेलदोडा पूड घालावी.
* शीतल दूध
साहित्य : दूध, सब्जाचं बी/ तुकुमराई, खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड.
दूध चांगलं उकळून नंतर गार करावं. रात्री सब्जाचे बी किंवा तुकुमराई पाण्यात भिजत घालावी म्हणजे चांगली फुगेल. खडीसाखर बारीक करून ठेवावी. दुपारी जास्त उन्हाच्या वेळी गार दुधातच खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड त्याचप्रमाणे भिजवलेलं सब्जाचं बी घालावं. यामुळे शरीरातील उष्णता आणि वाढलेलं पित्त नियंत्रणात येतं.
* खजूर-खवा-गुलकंदाचे रोल
खजूर बिया काढून अगदी मऊ करून घ्यावा. खवा मळून घ्यावा. नंतर खजूर व खवा एकत्र करून हे मिश्रण चांगलं एकजीव करावं. या मिश्रणाचा गोळा करून पोळपाटावर लाटावा व त्या पोळीवर गुलकंद पसरून त्याचा रोल करावा. त्याचे एक-एक इंचाचे तुकडे करून सुक्या खोबर्‍यात हे रोल घोळवून घ्यावं.
* व्हेज क्लिअर सूप
साहित्य : टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, धने, जिरे पूड, मीठ, साखर आणि गाईचं तूप.
कृती :- टोमॅटो उकडून घ्यावे. सालं काढून तुकडे करावे. कांद्याचेही तुकडे करावे. भरपूर कोथंबीर धुवून चिरून घ्यावी. सगळ्या भाज्या मिक्सरवर एकत्र फिरवून एकजीव कराव्या. गाळणीवर गाळून वरचा चोथा बाजूला ठेवावा. खाली भाज्यांचे स्वच्छ मिश्रण मिळेल.
कढईत गाईचं तूप घ्यावं. त्यात जिरे, हिंग यांची फोडणी करावी. त्यात वरील भाज्यांचे पातळ मिश्रण टाकून ते चांगलं उकळून घ्यावं. यात चवीपुरतं मीठ आणि साखर टाकावी.
एरवी आपण सूपमध्ये मिरेपूड, लवंग, दालचिनी इ. मसाले वापरतो. पण हे पदार्थ गुणानं उष्ण असल्यानं वापरू नये. धणे-जिरे मात्र उष्णता कमी करतात त्यामुळे ते सुपातून वापरावे.

No comments:

Post a Comment

Visit Our Page