Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 10, 2015

👀 डोळ्याच्या आजाराची कारणे 👀


👀 डोळ्याच्या आजाराची कारणे 👀



उष्णाभितप्तस्थ जलप्रवेशाद्दुरेक्षणात् स्वप्नविपर्य्याच्च | स्वेदाद्रजोधूमनिषेवणाच्च छर्देर्विघाताव्दमनातियोगात् ||१||
द्रवान्नपानातिनिषेवणाच्च विण्मुत्रवातक्रमनिग्रहाच्च | प्रसक्तसंरोदनशोककोपाच्छिरोभिघातादतिमद्यपानात् ||२||
तथा रूतुनाच्च विपर्य्ययेण क्लेशाभिघातादतिमैथुनाच्च| बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरीक्षणाच्च नेत्रे विकारान् जनयन्ति दोषाः||३||
वंगसेन नेत्ररोगाधिकार

गरमीमुळे व्याकुळ होऊन जलात प्रवेश केल्याने, दुरचे पदार्थ वस्तु नेहमी पाहील्यास, दिवसा झोपल्याने,
रात्री जागरण केल्याने, डोळ्यात घाम धुळ व धुर गेल्याने, उलटीचा वेग अडविल्याणे किंवा अत्याधिक उलट्या झाल्या असता, पातळ अन्नपानाचे अधिक सेवन केल्याने, मल मुत्र आणि अधोवायुचे वेग नेहमी अडविल्याणे, शोक किंवा राग अधिक केल्याने, डोक्याला मार लागल्याने, अत्याधिक मद्यसेवनाने, रूतुविपरीत आचरण केले असता, डोळ्याला क्लेश त्रास दिल्याने, डोळ्याला मार लागल्याने, मैथुनाचा अत्याधिक वापर केल्याने, अश्रुचे वेग अडविल्याणे, बारीक सुक्ष्म पदार्थ नेहमी पाहणे आदी कारणांमुळे वातादी दोष अनेक प्रकारचे दारूण रोग उत्पन्न करतात....

👀𠀠उपनेत्र (चष्मा) 😎

काही वर्षापुर्वी ४० वर्ष वय झाले की जवळचे पहावयासाठी चष्मा लागायचा. पण हल्लीच्या काळात कमी वयातच मोठ्या नंबरचे चष्मे लागतात. चष्म्याशिवाय स्पष्ट दिसत नाही.
डोळ्यांना .... नंबरचा चष्मारूपी टेकु लागतो. ५ इंद्रिय अधिष्ठानांपैकी नेत्रांवरच परिणाम का होतो याचाहि विचार आवश्यक आहे.
ऐकु येण्यासाठी एवढा त्रास कमी वयात होत नाही. किंवा त्वचेद्वारे स्पर्श ही कळायचे कमी होत नाही. किंवा जिभेची चवही कळायचे कमी होत नाही. किंवा नाकाद्वारे सुंगध दुर्गंध ही कळायचे सहज कमी होत नाही. पण डोळ्यांची दृष्टी निश्चितच कमी होते आहे. कमी वयात मोठ्या नंबरचे चष्मे आजुबाजुला पाहिले असता दिसतात. आयुर्वेदीय शास्रानुसार विचार केला असता खालील कारणांमुळे कमी वयात चष्मे (टेकु) लागतात..
१. गर्भिणी काळात विरूध्द अन्नाचे सेवन केल्याने मज्जादुष्टी होऊन तेजोमय डोळ्यांचे आरोग्य बिघडते.
२. सुतिका परिचर्या न पाळणे बालक जन्माला आला असता त्याला कमी प्रकाशाच्या खोलित ठेवण्यास सांगितले आहे कारण लहान वयात बाळ प्रकाशाला एकदम expose होऊ नये याकरिता.
३. बाळ आईचे दुध पित असताना आईने विरूध्द आहार केला तरी बाळाला त्रास सहन करावा लागतो. कफपित्त वाढुन नेत्रांवर परिणाम होतो.
४.प्रतिजैवकांचा अधिक वापर, कीटकनाशक वापरून तयार केलेले अन्न, उर्जेचा (light) चा वाढता वापर हाही नेत्रांच्या बलहानीकरिता कारणीभुत आहे.
५. वाढत्या वयासोबत विरूध्द अन्न सेवन हे अतिशय महत्वाचे कारण आहे. त्यात मिल्कशेक, फ्रुटसलाड, शिकरण पनीर, सोडायुक्त पदार्थ, दही, दुध फळे एकत्र खाणे, दुध मीठ एकत्र, आईसक्रीम.........!!!! यादी वरचेवर वाढत आहे आधुनिक काळात.....
वरील कारणे पुर्णपणे टाळणे अतिशय कठीण पण बरयाच प्रमाणात टाळता येण्यासारखी आहेत. पुर्वी कारणे घडली असतील तर योग्य आयुर्वेद आहार विहार चिकित्सक विषयक सल्ला वैद्याकडुन जरूर घ्यावा.

👀 उत्तम नेत्रांसाठी 👀

निरोगी असतानाही डोळे चांगले राहण्यासाठी नेहमी पुढील पदार्थांचे सेवन करावे.
सातु, गहु, साठीसाळीचे तांदुळ व हरीक ही १ वर्ष जुनी धान्यें व मुग वैगेरे कफ व पित्त यांचा नाश करणारी धान्यें ही तुपासह खावे.
अशाच प्रकारे भाज्या, डांळीब, खडीसाखर, सैंधव मीठ, मनुका हे पदार्थ, प्यावयास पावसाचे पाणी, पादत्राण्यांचा उपयोग आणि शास्रोक्त रितीने शोधन(शरीरशुध्दी) आदींनी नेत्रांचे आरोग्य सुस्थितीत राहते....

👀 नेत्रांसाठी अन्य उपाय👀

आयुर्वेदीय शास्रानुसार पायांमध्ये दोन मोठ्या शिरा असुन त्या पुढे डोळ्यापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळेच पायांस लावलेले तुप तैल उटणे लेप आदींचे काम डोळ्यापर्यंत होते.
मलोत्पत्ती, तळपायाला उष्ण (गरम) स्पर्श, पायांस नेहमी तुडवुन, दाबुन घेणे या कारणांनी नाड्या बिघडल्या तर डोळ्यासही विकार उत्पन्न करतात. म्हणुनच पादत्राने घालणे, पायांस तुप लावने व पाय धुणे हे प्रकार डोळ्यास हितकारक असतात. त्यांचा नेहमी वापर करावा...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका 

नांदेड

मो. 9028562102 , 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page