Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, December 25, 2015

विविध तेलांचे गुणधर्म

 विविध तेलांचे गुणधर्म

तैलं स्वयोनिगुणकृद्वाग्भटेनाखिलं मतम्||
अतः शेषस्य तैलस्य.....स्वयोनिवत्|| सार्थ भावप्रकाश
...
    तेल ज्या पदार्थांपासुन बनविले असेल त्या पदार्थांप्रमाणे तेलाचे गुणधर्म असतात असे वाग्भटाचार्यांनी सांगितले आहे...
    खाण्यासाठी कुठले तेल वापरावे हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. वरील सुत्रात या प्रश्नाचे उत्तर आहे.
तिळाचे तेल खाण्यास निषिध्द सांगितले आहे पण अभ्यंगासाठी उत्तम असते.
मोहरीचे तेल उष्ण (गरम) गुणात्मक असते त्यामुळे थंड प्रदेशात मोहरी तेलाचा वापर होतो.उदा. उत्तर भारतात थंडीपासुन संरक्षणार्थ मोहरीच्या तेलाचा वापर होतो.
     नारळ समुद्रकाठावर उगवतात आकाशिय गुणधर्माचे असल्याने जास्त पाऊस पडणारया दमट वातावरणात उपयोगी ठरतात. कोकण किनारपट्टी भागात खोबरयाच्या तेलाचा वापर शरीरासाठी उपयोगी ठरतो.
जवसाचे तेल व करडई तेल हे दोन्ही गरम गुणधर्माचे पाककाळात तिखट असल्याने डोळ्यांकरिता अहितकर आहेत.
     शेंगदाणा व सुर्यफल सर्वत्र पिकतात. साहजीकच त्यांचे तेल खाण्यासाठी आपल्या भागात सर्वात प्रशस्त असते.
         बादामाचे खसखस आंदी पौष्टीक पदार्थापासुनचे बनविलेले तेल बलवर्धक असते.
गेल्या काही वर्षात सर्वत्र पसरलेले तेल म्हणजे सोयाबीन तेल. सोयाबीन हा खुपच जड पदार्थ. याला शाकाहारींचे मटण असेही म्हणतात. सोयाबीन पचावयास जड असल्याने त्यापासुन बनलेले तैलही पचावयास जड होते. काळानुरूप लोकांचा आहार श्रम नसल्याकारणाने कमी होत आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचा उपयोग श्रम भुक चांगली असतानाच जास्त उपयोगी..
        दोन किंवा अधिक तेल एकत्र मिसळुन खाणे. हे गुणधर्माच्या चष्म्याने पाहता येत नाही. संयोगाचा परिणाम गुणधर्म काय होतो हे रूषिमुनीच सांगु शकतात. संयोग मुनिरेव जानाति |
एकाच तेलाचा वापर वारंवार तळण्यासाठी किंवा इतर प्रकारे करणे हे संस्कार विरूध्द होते. अशा तेलापासुन बनविलेले पदार्थ विरूध्द संस्काराचे बनतात. जे विरूध्द आहारसेवन जन्य आजारांची निर्मिती करू शकतात..
 तुप व तेल संस्कारीत पदार्थ 
ह्रद्याः सुगन्धिनो भक्ष्या लघवो घृतपाचिताः||
वातपित्तहरा बल्या वर्णदृष्टीप्रसादनाः|
विदाहिनस्तैलकृता गुरवः कटुपाकिनः||
उष्णा मारूतदृष्टिघ्नाः पित्तलास्त्वक्प्रदुषणाः| सु.सु.४६
    तुपाच्या संस्काराने बनविलेले पदार्थ मनास आनंद देणारे, सुगंधी, पचावयास हलके, वातपित्तनाशक, बलवर्धक, वर्ण आणि दृष्टीसाठी हितकारक असतात.
 तर तेलाच्या संस्काराने बनविलेले पदार्थ विदाहकर (जळजळ निर्माण करणारे), पचावयास जड, पचनाचा शेवटी तिखट बनणारे, गरम, वात आणि दृष्टीसाठी अहितकारक, पित्तवर्धक आणि त्वचेकरिता हानीकारक असतात...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

No comments:

Post a Comment

Visit Our Page