Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, April 24, 2016

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 5
चिंतन मनन
आज नष्ट पाडवा !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळेच देतात. मी नष्ट पाडव्याला शुभेच्छा देतो.
जुने बुरसटलेले विचार आणि नवीन विचारातील बुरशी लगेचच्या लगेच नष्ट होवो, आणि चांगल्या आरोग्याचे योग्य विचार स्थिर होवोत, ही ईश्वराकडे प्रार्थना !
या निमित्ताने थोडंस चिंतन मनन करूया.
हम कितने पानी मे डुबे है, इसका अंदाजा आ जाएगा !
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी काय मिळवले, काय गमावले, आणि पुढे काय करायचे आहे हे स्वतःशीच ताडून बघणे म्हणजे चिंतन !
त्यासाठी काय करायला हवे, याचे मनामधे आडाखे बांधणे म्हणजे मनन !
या दोन्ही प्रक्रिया कोणी करत असतील असे वाटत नाही. त्यासाठी सतत वर्तमानात रहायला शिकले पाहिजे.
आम्ही दररोज आहोत, त्या क्षणात न रहाता, भूतकाळात किंवा भविष्य काळात स्वतःला नेतो आणि वर्तमानाचा आनंद हरवून बसतो.
आता हेच बघा ना .....
दात घासत असताना आपले बोट दातावर फिरत असते, पण मन चहाच्या वासात रमलेले असते,
दात घासतानाच्या येणार्‍या कुर्रकुर्र आवाजाची लय आम्ही कधी पकडलीच नाही.
चहा पिताना "व्वा" असं म्हणायलाच विसरतो, कारण तोपर्यंत वाॅटसअपचे मेसेज येणे सुरू झालेले असते.
पोरांच्या अभ्यासाच्या चौकशीचं नाटक करताना दाढी "उरकून" घेतलेली असते. दाढी करताना देखील आपण स्वतःचे स्वतः नसतो.
तोपर्यंत नाश्त्याचा मेन्यू डोक्यात पिंगा घालायला लागलेला असतो. नाश्ता करायला बसलो तरी मन त्यात कुठे रमतंय.... ते पळालेलं असतं आज ड्रेस कोणता घालायचा हे विचार करायला....
ड्रेस घालत असताना त्या कपड्यांना येत असलेला कडक इस्त्रीचा वास आता कधी घेतलाय हे आठवतंच नसेल !
अगदी आंघोळ करताना सुध्दा, किती दिवसापूर्वी बाथरूम मधे गाणं गुणगुणले होते, हे जरा मनाला विचारून पहा.
आंघोळ करताना पाण्याच्या स्पर्शाचा, उटण्याच्या रंगाचा, त्याच्या गंधाचा, बालदीमधे तांब्या बुडवल्यानंतर येणार्‍या बुडबुड आवाजाचा आनंद गेल्या वर्षी किती वेळा घेतलाय ?
सतत पुढे पुढे जाणार्‍या या मनाला जरा आवर घालून वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
हे खरं सुख आहे.
यातच खरा आनंद आहे.
बायकोला गजरा आणून किती दिवस होऊन गेलेत हो,
काही आठवतेय का ?
पण तिच्या मनात मात्र तिने मागील गजर्‍याच्या स्मृती अजूनही ताज्या ठेवलेल्या आहेत. जरी तिचं मन भूतकाळात गेलेलं असलं तरी....
वर्तमानात शाबूत असलेला...
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

आजची आरोग्यटीप

   आजची आरोग्यटीप
आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 6
नियमितपणे व्यायाम
आज व्यायामाचे महत्व सगळेच जण सांगतात. करीत मात्र कोणीच नाहीत.( अगदी डाॅक्टर सुध्दा ! सन्माननीय अपवाद सोडून ...)
नवीन वर्ष सुरू झाले की दरवर्षी ठरवतो, आता व्यायाम नियमाने दररोज करायचा !
पण हाय रे दैवा,
जसं जसे दिवस पुढे जातात, तसंतसे या निश्चयाचा जोर ओसरू लागतो, ते प्रत्येकजण "सवडच होत नाही " या हमखास वाक्यावर येऊन थांबतो आणि व्यायाम पुनः वर्षभर बंद पडतो.
मधे मधे कोणीतरी आठवणीनं, प्रेमानं विचारलं तर कोणता तरी काढीव मुहुर्त शोधला जातो. ....
पण
तेरड्याचा रंग तीन दिवस !
पुनः येरे माझ्या मागल्या !
प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचा व्यायामपण वेगवेगळा असणं स्वाभाविक आहे.
वजन कमी करण्यासाठीच फक्त व्यायाम करायचा असतो ही डोक्यातली वेडगळ कल्पना आधी काढून टाका.
सकाळी आंघोळीच्या अगोदर किमान पंधरावीस मिनीटे स्वतःसाठीच राखीव ठेवावीत.
यात आपणाला जमेल तो, झेपेल तो व्यायाम करावा. काहीजण सूक्ष्म व्यायाम करतील तर काहीजण एरोबिक्स !
काहीजण दंडजोर बैठका मारतील तर काहीजण सूर्यनमस्कार घालतील,
जो जे वांछील तो ते लाहो,
फक्त काही वैश्विक नियम सांगतो.....
मोकळ्या हवेत व्यायाम करावा.
मिशीच्या ठिकाणी, काखेत घाम यायला सुरवात झाली की थांबावे.
अति हट्टाने,
कोणीतरी सांगितले म्हणून,
दुसरा एवढे डिप्स मारतो म्हणून,
वाॅटसपचे मेसेज वाचून,
व्यायाम करण्याने व्यायाम अंगलट येण्याची शक्यता असते.
एसी जिममधे केलेल्या व्यायामामधे घाम कधी येतोय ते कळणारच नाही. धोक्याचा इशारा कळलाच नाही तर दगाफटका निश्चित !
समझनेवालो को इशारा काफी होता है !
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग - 7
नियमितपणे व्यायाम केला, तर काय होऊ शकते, हे आज सर्वांनी वाचले असेलच.
हो.
अनंत नीता मुकेश धीरूभाई अंबानींची गोष्ट म्हणतोय मी !
18 महिन्यात 108 किलो वजन केवळ नैसर्गिक उपायांनी कमी करणे,
ही साधी गोष्ट नक्कीच नाही.
त्यांनी काही व्यायाम केले.
महत्वाचे म्हणजे जीभेवर संयम ठेवून "नियमितपणे" व्यायाम केला. व्यायामात "सातत्य" राखले, म्हणून परत माणसात आले.
असो.
आंघोळीपूर्वी केलेल्या व्यायामाने भरपूर घाम येतो. स्रोतसे आतून मोकळी होतात. चरबीसुध्दा विरघळू लागते. घामात रूपांतरीत होते आणि निघून जाते. ( हे समजून घेण्यासाठी हं )
सांगायचंय काय.....
भरपूर घाम आला पाहिजे.
तर लवकर बारीक होता येते.
आणि
आणखीन एक महत्वाचं...
मी जाड आहे, मी बारीक आहे, माझं वजन कमी करायचं आहे,
हे कोणी ठरवायचं ?
पुस्तक वाचून किंवा छापील नियम ऐकून ठरवायचं ?
उदा. जगात अनेक देशातील सोळा ते वीस वर्षाच्या मुलांना किंवा मुलींना एकत्र उभे केले तर ते सगळे एकाच आकाराचे दिसतील ?
आताच्या आयपीएल क्रिकेट टीम मधील मुलांकडे बघा ! समान वयाच्या दोघांपैकी एखादा राक्षसच दिसतो आणि एखादा कोवळ्या काकडीसारखा !
हा फरक राहाणारच ! प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत,
काहीजण म्हशीरेडे खातात, काही कुत्रेपण खातात, तर काही तरकारी, पालेभाज्या शुध्द शाकाहारी !
आता यांची शरीरयष्टी त्या यष्टींच्या समोर कशी दिसते पहा ना !
पण ताकद ?
सर्वांची सारखी.
हरबार "जाडी" मायना नही रखती।
त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्वाच्या आड जर तुमचे वजन येत नसेल तर क्या बिगडता है ?
जाडी असूनही चपळता, लवचिकता, कर्मसामर्थ्य, आरोग्य हे असलं की झालं ...जे योग्य व्यायामानी मिळते...म्हणुन व्यायाम महत्वाचा आणि त्यासाठी वैद्यांचा सल्लादेखील !
निर्मितीताई सावंतना त्यांचे व्यक्तीमत्व कधीच बाधक ठरले नाही, आरोग्याला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करू नका.
आता नीताताईंच्या अनंताची गोष्टच वेगळी !
वैद्य सुविनय दामले.
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

Tuesday, April 5, 2016

रक्तदाब, मधुमेह गंभीर आजार 🍀

रक्तदाब, मधुमेह गंभीर आजार 🍀
रक्तदाब वाढलेले खुप सारे लोक आजुबाजुला पाहायला मिळतात. बहुतेक लोकांना वयाची ४० शी व पन्नाशी पार केली की रक्तदाब वाढलेला आढळतो. बरयाचस्या लोकांत रक्तदाब हा त्याही पेक्षा कमी वयात झालेला आढळतो वयवर्ष २० पासुन काही जणांत रक्तदाब वाढलेला आढळतो.
रक्तदाबाचा त्रास हा शरीरावर आजपर्यंत आहार निद्रा मैथुन या त्रयोपस्तंभांचे पालन न करता केल्या गेलेल्या अत्याचाराचे प्रतिक म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही.
रक्तदाबाचा त्रास निर्माण होईपर्यंत यथेच्छ प्रमाणात इंद्रीयसेवन करून शरीराचा नाश केला जातो. आहार निद्रा बह्मचर्यचे कुठलेही नियम जे आजारमुक्त शरीर टिकविण्यासाठी आवश्यक आहेत ते पाळले जात नाहीत..
शरीराची सहन करण्याची क्षमता संपली की मग शरीर रक्तदाब मधुमेह सारखे दुर्जर उपद्रव दाखविण्यास सुरू करते. मग वेगवेगळे उपाय करून शरीराची प्रयोगशाळा बनते. परिस्थिती उद्भवु नये यासाठी प्रयत्न न करता त्रास सुरू झाल्यावर उपाय शोधले जातात.
जसे दुष्काळ पडला असता बोअर विहार खणली जाते पण परिस्थिती वरचेवर गंभीर बनते.
रक्तदाब मधुमेह सारखे आजार लवकर उद्भवु नये असे वाटत असेल तर त्रयोपस्तंभ ( आहार निद्रा बह्मचर्य) यांचे पालन अत्यावश्यक आहे. नाहीतर त्रास ठरलेलेच.
रक्तदाब मधुमेह त्रास असणारयांसाठी तर त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतर आजाराची तीव्रता वरचेवर वाढत जाते जरी antihypertensive, antidiabetic गोळ्या सुरू असतिल तरी....
सांगायचा उद्देश एवढाच मुळापासुन रक्तदाब मधुमेह कमी होण्यासाठी उपाय सांगा असे प्रश्न वांरवार येतात. या प्रश्नांचे उत्तर त्रयोपस्तंभ पालनात दडले आहे सोबत आयुर्वेदीय निदान पुर्वक आजारांची उद्भवण्याची कारणे पाहुन केलेली चिकित्सा बरयांच अंशी फलदायी ठरते.
मोठ्या आजारांचा सामना करताना जेथे स्वभावपरमवाद उपयोगी ठरत नाहीत म्हणजे शरीर स्वतः दुरूस्त होत नाही अशावेळी त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही हे नक्की...
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

Saturday, April 2, 2016

निद्रानाश / अल्पनिद्रा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे
🍀 निद्रानाश / अल्पनिद्रा ☘
निद्राल्पता उतारवयात सहजच उत्पन्न होणारा त्रास आहे. कारण उतारवयात शरीरात वाताचे आधिक्य असते त्यामुळे निद्राल्पता निर्माण होते.
🍀 निद्रानाशाची कारणे ☘
नावनं लघनं चिंता व्यायामः शोकभीरूषः||
एभिरेव भवेन्निद्रानाशः श्लेष्मातिसंक्षयात् ||
नस्य करणे नाकात तीक्ष्ण औषधी तेल आदी टाकणे, लंघन करणे उपवास आदी कारणांनी, चिंता अत्याधिक प्रमाणात असणे, व्यायामाच्या आधिक्याने, शोक भीती राग आदी मानसिक वेगांच्या अतियोगामुळे निद्रेचा नाश होतो. शरीरातील कफाचा क्षय झाल्याने निद्रानाश निद्राल्पता निर्माण होते.
😵 अकाली निद्रा रोगकारक 😵
अकालशयनान्मोहज्वरस्तैमित्यपीनसाः|
शिरोरूकशोफह्रल्लास्रोतोरोधाग्निमंदताः|| वा.सु.८/६०
अकाली झोपल्याने मुर्च्छा, ताप, शरीरात ओलसरपणाचा भास होणे, पीनस, डोकेदुखी, सुज, तोंडस पाणी येणे, शरीरात अवरोध निर्माण होणे, भुक मंद होणे असे त्रास होतात....
☘ निद्रानाशासाठी काही उपाय ☘
१.महिषीक्षीरं स्वप्नजननानाम् | च.सु.
कफक्षीण झालेल्या व्यक्तींमध्ये म्हशीचे दुध कफवर्धन करून निद्रानाश कमी करणारे ठरते.
अन्य कफवर्धक पदार्थांचा उपयोग ही निद्रानाशाकरिता होतो. त्यांचा योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपयोग करावा..
☘ बाह्योपचार 🍀
नित्य तेलाने अभ्यंग करणे, उदवर्तन, स्नान आदींचा योग्य सल्ल्याने उपयोग केला तर निद्रानाशासाठी उपयोग होतो.
🍀 मनासाठी उपाय 🍀
प्राणायाम, अनुलोम विलोम या अष्टांग योगाचा उपयोग यम नियम पाळुन मनाच्या आरोग्याकरिता करता येईल.
शिरोधारा, तुपाचे नस्य करणे, तर्पण, मनावर काम करणारया औषधींचा उपयोग आदी उपक्रमांचाही मनोदुष्टीजन्य निद्रानाशात उपयोग करता येतो.
निद्रा त्रयोपस्तंभापैकी म्हणजे शरीररूपी घराच्या ३ खांबापैकी १ आहे. निद्रा प्राकृत असेल तर शरीरस्वास्थ्य उत्तम राहते अन्यथा सर्वप्रकारच्या आजारांचा सामना निद्रानाश / निद्राल्पतेने करावा लागतो.
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र
 पावडेवाडी नाका
 नांदेड
Cont no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

घरोघरी आयुर्वेद‬

#‎घरोघरी_आयुर्वेद‬
बस्ती हे पंचकर्मातील एक कर्म. या प्रक्रियेत गुदमार्गाद्वारे काढ्याचे वा तेलाचे मिश्रण दिले जाते. शरीरातील वात वाढला की; बस्ती हा अतिशय उत्तम परिणामकारक उपाय आहे. या उपक्रमाला ‘बस्ती’ असे नाव का पडले ठाऊक आहे का? पूर्वीच्या काळी बस्ती देण्यासाठी मृत प्राण्यांचे मूत्राशय काढून- स्वच्छ करून त्यात काढे वा तेलाचे मिश्रण भरून बस्ती दिला जात असे; जेणेकरून या मुत्राशयातील स्नायूंवर योग्य दाब दिल्यास त्यातील औषध शरीरात पोहचावे. या मूत्राशयास संस्कृतमध्ये ‘बस्ती’ असे म्हणतात. त्याच्या सहाय्याने दिला जातो म्हणून हा उपक्रमदेखील ‘बस्ती’ याच नावाने ओळखला जाऊ लागला. आजही बस्ती अशाच पद्धतीने दिला जातो का? उत्तर आहे....नाही! सध्याच्या काळात; बहुतांश दाक्षिणात्य राज्यांत प्लॅस्टिकच्या जाड पिशव्यांचा वापर करून बस्ती दिला जातो. आपल्याकडे बहुतेक वैद्य हे एनिमा सिरींज आणि कॅथेटर यांच्या सहाय्याने बस्ती देतात.
सांगण्याचा मुद्दा असा की; ‘आयुर्वेदाने काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे. नाहीतर साचून राहिलेल्या डबक्याप्रमाणे आयुर्वेदाची गत होईल’ अशी आपली विद्वत्ता पाजळणाऱ्या ‘स्वयंघोषित’ विद्वानांची कमतरता नाही. कित्येकदा त्यांची ही तथाकथित ‘सुधारक’ मते आपल्यालाही ‘जबरदस्त’ वगैरे वाटत असतील. मात्र अशी सनसनाटी विधान करणाऱ्या लोकांचा आयुर्वेदातला अभ्यास नेमका किती असतो हे सर्वप्रथम बघायला नको का? आयुर्वेदाचा सांगोपांग अभ्यास असणारा कुठलाही माणूस आपल्याला सांगेल की; आयुर्वेदाने नेहमीच काळानुसार आवश्यक बदल स्वीकारले आहेत. मात्र तसे करताना ते बदल केवळ तपशीलातील बदल आहेत. त्याच्या ‘कोणत्याही’ मुलभूत सिद्धांताला धक्का लागलेला नाही. (यावर स्वतंत्रपणे लिहीनच.) त्यामुळे अशा सुधारकांना माझी एकच विनंती आहे की; अशी चक्रम विधाने करण्यापूर्वी आपले ज्ञान पुन्हा एकदा तपासून पहा.
उगाच आपली थोरवी तमाम लोकांनी गावी; यासाठी आयुर्वेदाच्या आडून शिखंडीसारखे बाण चालवत बसू नका.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Visit Our Page