Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, April 24, 2016

आजची आरोग्यटीप

   आजची आरोग्यटीप
आंघोळी पूर्वी काय करावे -भाग 6
नियमितपणे व्यायाम
आज व्यायामाचे महत्व सगळेच जण सांगतात. करीत मात्र कोणीच नाहीत.( अगदी डाॅक्टर सुध्दा ! सन्माननीय अपवाद सोडून ...)
नवीन वर्ष सुरू झाले की दरवर्षी ठरवतो, आता व्यायाम नियमाने दररोज करायचा !
पण हाय रे दैवा,
जसं जसे दिवस पुढे जातात, तसंतसे या निश्चयाचा जोर ओसरू लागतो, ते प्रत्येकजण "सवडच होत नाही " या हमखास वाक्यावर येऊन थांबतो आणि व्यायाम पुनः वर्षभर बंद पडतो.
मधे मधे कोणीतरी आठवणीनं, प्रेमानं विचारलं तर कोणता तरी काढीव मुहुर्त शोधला जातो. ....
पण
तेरड्याचा रंग तीन दिवस !
पुनः येरे माझ्या मागल्या !
प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचा व्यायामपण वेगवेगळा असणं स्वाभाविक आहे.
वजन कमी करण्यासाठीच फक्त व्यायाम करायचा असतो ही डोक्यातली वेडगळ कल्पना आधी काढून टाका.
सकाळी आंघोळीच्या अगोदर किमान पंधरावीस मिनीटे स्वतःसाठीच राखीव ठेवावीत.
यात आपणाला जमेल तो, झेपेल तो व्यायाम करावा. काहीजण सूक्ष्म व्यायाम करतील तर काहीजण एरोबिक्स !
काहीजण दंडजोर बैठका मारतील तर काहीजण सूर्यनमस्कार घालतील,
जो जे वांछील तो ते लाहो,
फक्त काही वैश्विक नियम सांगतो.....
मोकळ्या हवेत व्यायाम करावा.
मिशीच्या ठिकाणी, काखेत घाम यायला सुरवात झाली की थांबावे.
अति हट्टाने,
कोणीतरी सांगितले म्हणून,
दुसरा एवढे डिप्स मारतो म्हणून,
वाॅटसपचे मेसेज वाचून,
व्यायाम करण्याने व्यायाम अंगलट येण्याची शक्यता असते.
एसी जिममधे केलेल्या व्यायामामधे घाम कधी येतोय ते कळणारच नाही. धोक्याचा इशारा कळलाच नाही तर दगाफटका निश्चित !
समझनेवालो को इशारा काफी होता है !
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ
कुडाळ .
महाराष्ट्र
416520
India
Email:
drsuvinay@gmail.com
Phone:
02362221821
Mobile:
9421147420

No comments:

Post a Comment

Visit Our Page