Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, May 22, 2016

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंघोळीनंतर काय ? भाग 9
प्रसन्नपणे आंघोळ झाली. छान मस्त कपडे परिधान केले. आता कुठे जायचं ?
देवघरात !
हं.
किमान 10 मिनीटं देवासमोर बसावं. त्याचं रूप आठवावं. त्याच्याशी एकरूप व्हावं.
त्याचंच सूक्ष्म रूप म्हणजे "मी" आहे हे जाणावे. हा सकारात्मक  अहं जागृत करावा.
कोऽहंचं उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
ते उत्तर सोऽहं आहे, या आनंदी अवस्थेत भानावर यावं, समोरच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घालावा.
*"देवा, तुझ्याच कृपेमुळे आतापर्यंतचा माझा प्रत्येक क्षण आनंदात गेलाय, यापुढेही तू मला आनंदात रहायला शिकव.*
*तू जी परिस्थिति निर्माण करतो आहेस, ती माझ्या हिताची आहे, हे समजून घ्यायला तूच मला मदत कर.*
*सुख किंवा दुःख काहीही असो, मला स्थिरबुद्धी बनव.*
*असेल त्या परिस्थितीत संधी निर्माण करण्याची दृष्टी मला तू दे.*
*या संधीचे सोने बनवण्याची माझी हिंमत कमी होऊ देऊ नकोस*
*शेवटपर्यंत माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत, हे धैर्य तू मला दे.*
*तुझ्यावरचा माझा विश्वास किंचीतही हलू देऊ नकोस.*
*देवा, मला दुसरं काहीही नको.*
*हेची दान देगा देवा*
*तुझा विसर न व्हावा !"*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून केलेली अशी आर्त प्रार्थना "त्याच्या"पर्यत पोचते, यावर आपला विश्वास हवा, (नसल्यास निर्माण व्हायला हवा.) यालाच श्रद्धा म्हणतात. या श्रद्धेनेच अनेक रोग बरे होतात. हा अनेकांचा अनुभव आहे.
(... श्रद्धया हरिसेवनम् )
देवासमोरची ही दहा मिनीटे, या आत्म्याची त्या परमात्म्याशी झालेली भेट असते.
या अलौकीक भेटीला नंतर नंतर दहा मिनीटं सुद्धा लागत नाहीत, एक क्षणदेखील पुरेसा असतो.
( ....पातुं विष्णुपदामृतम् )
( उभा क्षणभरी...तेणे मुक्ती चारी)
 एकमेकांचा सहवास, सान्निध्य हे ऊर्जा प्रदान करणारे असते.
माहेरचा माणूस भेटल्यानंतर कित्ती उर्जावान होतो ना आपण ! खूप आनंद होतो ना !
लाईटचं बटन दाबल्यावर कसा लख्ख उजेड पडतो,
अगदी तस्सच वाटतं,
या जीवाला, शिवाला भेटल्यावर !!
*फक्त ही भेट घडवणं महत्वाचं असतं.*
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
23.05.2016.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

Visit Our Page