Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 23, 2016

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

#आयुमित्र

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

       मेंटल जिम? हा काय नवीन प्रकार बर आता? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जिम म्हणजे निरोगी रहाण्यासाठी शारीरक कसरत करण्याचे एका बंदिस्त ठिकाण. शरीर निरोगी राहण्यासाठी जसे जिम आहे, त्याच प्रमाणे मन सुदृढ रहाण्यासाठी सुद्धा मेंटल जिम असते. ती कशी ते बघूया.

मेंटल जिम आणि आयुर्वेदीय धारणीय वेग

दैनंदिन जीवनात बरेच अस प्रसंग येतात जिथे आपल्याला चीड येते, राग येतो, लोभ होतो, ईर्षा होते अश्या वेळी आपण त्याठिकाणी त्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. ह्यामुळे अशांती, निराशा, ताण आपल्याला येत असतो. आयुर्वेद म्हणते कि लोभ, शोक, भय, क्रोध/राग, अहंकार, निर्लज्जता, ईर्षा, आसक्ती, दुसरयाचे धन मिळविण्याची इच्छा ह्या मनाच्या वेगाचे आडविण्याची कसरत आयुर्वेदाने करायची सांगितली आहे. ह्या मेंटल जिम मुळे मनाच्या पेशी अधिक मजबूत होतात आणि मन निरोगी राहते.

ज्यांना काही आजार आहेत, विशेषतः स्थौल्य, डायबेटीस, आम्लपित्त इत्यादी कि ज्यामध्ये पथ्य पाळणे महत्वाचे असते. बऱ्याच पदार्थ्र ऑफर केल्यावर आपल्याला नाही म्हणता येत नाही, जसे स्वीट्स, आईसक्रिम, फास्टफूड, कोल्डड्रिंक्स अश्यावेळी सुद्धा मेंटल जिम उपयोगी पडते. मनाला नाही म्हणण्याची कसरत आपण केली तर बरेच आजार आपण दूर ठेवू शकतो.

चला तर, शरीर व मनाला निरोगी ठेवूया आणि मेंटल जिम करूया.  

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693

drbhushandeo@gmail.com

Tuesday, November 22, 2016

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

#आयुमित्र

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

     सध्या लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. अनेक तरुण जोडपी आपल्या जीवनाची नवी सुरवात करणार आहेत. लग्न झाल्यानंतर पतीपत्नी संततीप्राप्ती गर्भाधानाकडे वळतात. आयुर्वेदात ह्याला सुद्धा एक संस्कार म्हंटलेले आहे. उत्तम व निरोगी संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असल्यास उचित गर्भाधान विधी करणे महत्वाचे आहे.
गर्भाधनाची पूर्वतयारी कशी करावी?

“शुध्दबिजा पोटी फळे रसाळ गोमटी..|”

जसे उत्तम व निरोगी फळासाठी बीजही उत्तम व शुध्द हवे, तसेच निरोगी व उत्तम संतती प्राप्तीसाठी शुक्र(पुरुष बीज) व शोणित( स्त्रीबीज) हे शुध्द असणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. शुध्द स्त्री व पुरुषबीजासाठी पतीपत्नीने खालील उपाय करावे.

1) दोघांनी वैद्यानकडून शरीरशुद्धी म्हणजेच पंचकर्म करून घ्यावे.

2) पुरुषाने गाईचे दुध, तूप आहारात घ्यावे तर स्त्रीने तीळ तेल व उडीद ह्याचा आहारात वापर करावा.( टीप– सोबत इतर आहार सुद्धा घेऊ शकता पण प्रामुख्याने वरील आहार घ्यावा. तसेच आपल्या वैद्यांशी संपर्क करून ह्या आहाराचे प्रमाण निश्चित करून घ्यावे.)

3) एक महिनाभर वरील आहार घ्यावा व ह्याकाळात दोघांनी ब्रम्हचर्य पालन करावे.(शरीरसंबंध ठेवू नये)  

वरील उपायांनी स्त्री व पुरूषबीज सुदृढ व शुध्द होते आणि पुढे उत्तम संतातीसाठीचे गर्भाधान करता येते. 

निरोगी संतती हि निरोगी समाज निर्माण करेल आणि निरोगी समाज निरोगी देश निर्माण करेल. 

(आजचा लेख खास माझ्या सर्व नव वर व वधु मित्र मैत्रीणीना समर्पित)

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693

drbhushandeo@gmail.com

Sunday, November 20, 2016

डायबेटीस आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*डायबेटीस आणि आयुर्वेद*

     आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते.

*ह्याचे कारण काय?*

1) हाय कॅलरी असलेला आहार.

2) वाढलेले व्यसनांचे प्रमाण.

3) व्यायामाचा अभाव

4) स्थौल्य

5) वाढता मानसिक ताण-तणाव

6) बदलती जीवनशैली

*आयुर्वेद काय म्हणते?*

    *“प्रकृष्टोमेह: यास्मिन रोगे स प्रमेह:* म्हणजेच ज्या रोगात मुत्राचे प्रमाण वाढते (प्रभुताविलमुत्रता) तो प्रमेह. प्रमेह हा व्याधी डायबेटीस ह्या व्याधीशी मिळता-जुळता आहे. डायबेटीससाठी प्रचलित शब्द ‘मधुमेह’ हा प्रमेहाच्या वाताज प्रकारपैकी एक आहे.

*आयुर्वेदानुसार प्रमेहाची करणे-*

    नवे धान्य वापरणे, नवे तांदूळ, उडीद व डाळींच अतिप्रमाणात घेणे, खीर, खिचडी, भात अधिक घेणे, नवीन मद्य/दारू पिणे, न विरजलेले दही, ताजे दही, द्रव पदार्थ, गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेणे, पंचकर्म व व्यायाम न करणे, अधिक झोपणे, झोपून वा बसून राहणे, हे सर्व करणे शरीरात कफ, चरबी वाढवतात आणि प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.

    चला तर मित्रांनो, *योग्य व गरजे इतकाच आहार घेऊया आणि पुरेसा व्यायाम करूया आणि भारताला डायबेटीस मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया.*

*वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद, जळगाव* *
8379820693

http://wp.me/p7ZRKy-4k

Wednesday, November 16, 2016

आपली झोप आणि आयुर्वेद

आपली झोप आणि आयुर्वेद
by aayumitra

      देशात सध्या “गरीब रात्री झोपतो आहे, श्रीमंत जागा आहे”, इमानदार झोपला आहे, बेईमानांची झोप उडाली आहे”, अश्या घोषणा ऐकायला मिळताय. मोठ्या नोटा बंद झाल्याने अनेकांना अनिद्रेचा त्रास होतोय.

      आयुर्वेदाने निद्रेला आहार, निद्रा व ब्रम्हचर्य ह्या तीन महत्वाच्या उपस्तंभात सहभागी केले आहे. योग्य पद्धतीने झोप घेतल्यास आरोग्य प्राप्ती होते. परंतु खूप झोपल्याने, न झोपल्याने, जेवल्यावर लगेच झोपल्याने, उन्हाळा सोडून इतर ऋतूत दिवसा झोपल्याने  आपले आरोग्य धोक्यात येवू शकते. जे बाल, वृध्द आहेत, खूप थकलेले आहेत व ज्यांचे शारीरिक व मानसिक बल कमी झाले आहे अश्या व्यक्तींना निद्रेच सगळे नियम लागू होत नाहीत.

        चांगली झोप येण्यासाठी/ निद्रानाश झालेल्यांनी अभ्यंग( अंगाला तेल लावणे), पादाभ्यंग(तळपायाला तेल लावणे) दारारोज करणे, गाईचे दुध व तूप आहारात घेणे, चांगले संगीत ऐकणे, झोपयची जागा स्वच्छ, सुवासिक ठेवणे, झोपण्याची बिछाना/गादि मुलायम व सुखकारक वापरणे उपयुक्त ठरते.

     किती वेळ झोपावे? हा प्रश्न नेहमीच विचारल्या जातो. ह्याचे उत्तर सगळ्यांसाठी एकसारखे नाही. लहान मुले, तरुण व वृध्द ह्यांची झोप वेगवेगळ्या प्रमाणात असते. शारीरिक व मानसिक  प्रकृतीनुसार सुद्धा झोपेचे प्रमाण कमी जास्त असू शकते. जसे आपले पंतप्रधान फक्त ४ तास झोपतात व बाकी पूर्णवेळ कार्यरत असतात. कफ प्रकृतीचे लोक जास्त झोपतात तर वाताज प्रकृतीचे लोक कमी झोपतात. काही लोक अभ्यासपूर्वक आपला झोपेचा वेळ कमी जास्त करू शकता.

 

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद,
जळगाव 8379820693

मला पोट कमी करायचे आहे

*मला पोट कमी करायचे आहे.*
दररोज नित्याचा प्रश्न - मला फक्त पोट कमी करायचे आहे, कंबरेचा काही घेर कमी करायचा आहे.
त्या निमित्ताने काही टिप्स्
* आहाराच्या मात्रेवर नियंत्रण ठेवा.
* आहारामध्ये नियमित बदल करा.
* नेहमीच्या आहारातील तोच तो पणा टाळुन प्रत्येक वेळी चरबी न वाढविणारा वेगवेगळा पदार्थ काण्याचा प्रयत्न करा.
* आहाराच्या पदार्थामध्ये नियमित आहाराएवजी फळे-पालेभाज्या-फळांचा रस-पालेभाज्यांचे सूप-स्मूदी-वाफविलेली कडधान्ये-पालेभाज्यांचे थालीपीठ,पालेभाज्यांची खिचडी, कोशिंबीरी इत्यादींचा समावेश असावा.
* भूक शिल्लक ठेऊनच जेवण करावे. पोट भरण्यापुर्वी ताटावरून उठावे.
* खाण्याच्या वेळा ठरवुन घ्याव्यात. जेवण नेहमी वेळेवरच घ्यावे. 
* रात्री लवकर जेवावे म्हणजे सुर्यास्ताच्या पुर्वी जेवण करण्याचा प्रयत्न करावा. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. किमान जेवल्यानंतर ३ तासांनी झोपावे.   
* तळलेले पदार्थ-बेकरीचेपदार्थ-मैदा-फास्टफूड- कोल्ड्रिक्न्स, आईसक्रिम-पिझ्झा-केक-बिस्किटस-फरसान-मांसाहार-गोड पदार्थ, वडापाव, मिसळपाव, शिवपुरी, पाणीपुरी, पुरीभाजी, पावभाजी, वेगवेगळ्या प्रकारचे राईस,पातळ ताक,कढी,मठ्ठा यामूळे पोटाचा घेर वाढतो किंवा वजन वाढते हे कायम लक्षात असू द्यावे.
* जेवणानंतर दिवसा झोपल्याने वजन वाढते हे लक्षात ठेवावे.
* सतत एका ठिकाणी बसून राहील्याने वजन वाढते-पोट-कंबरेचा भाग वाढतो. ते टाळावे.
* कामाच्या ठिकाणी किवा घरी असताना सुद्धा बैठे काम जास्त असल्यास दर एका एका तासांनी उठुन पाय मोकळे करावेत.आणि पुन्हा ५ मिनिटांनंतर पुन्हा काम करण्यास बसावे.अश्यानी अतिरिक्त चरबी शरीरमध्ये साठणार नाही.
* पोट-कंबर कमी करण्यासाठी त्याभागाला ताण देणारे व्यायाम नियमित करणे आवश्यक असते.
* पोट-कंबरेचा भाग कमी करण्यासाठी आम्ही लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे
दोरीच्या उड्या, उठबश्या, जागच्या जागी जॉगींग, सिटअप्स्, त्रिकोणासन, पायरया चढ उतार करणे, पुशअप्स् व घराच्या बाहेर चालणे किंवा पळणे या आठ व्यायामाचा सेट करण्याचा सल्ला देतो.
* याशिवाय शरिरावरील चरबी कमी करण्यासाठी *लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे बनविण्यात आलेल्या मेदोनाशक उद्वर्तन पावडर हे आंघोळीच्या वेळेस शरीरावर मालीश करण्यासाठी व रुक्षण तेल हे आंघोळीपुर्वी शरीरावर मालीश करण्याचे तेल रुग्णांना दिले जाते.* चरबी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी शास्त्रोक्त बाह्य उपचार आहे.
*या सर्व उपचारांनी एका महिन्यात ३-४ सेंमी पोट कंबर आतमध्ये जाते असा अनुभव आहे.*
*डॉ. पवन लड्डा-डॉ. कविता लड्डा*
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बॅक ऑफ महाराष्ट्र शेजारी, बार्शी रोड लातूर.
*वजन कमी करण्याच्या विविध पॅकेजेसच्या माहीती करिता व्हॉट्सएप नंबर ०९३२६५११६८१*
*आपल्या इतर ग्रुपमध्ये, परिवारातील सदस्यांना ही माहिती नक्कीच फॉरवर्ड करा.*

Saturday, November 12, 2016

शौच्चानंद कसा मिळेल?/ “शी” ला कसे बसावे?

डॉक्टर ह्या विषयवार कोणी केख लिहत का? आता हे सुद्धा तुम्ही आम्हला सांगणार का? काही का राव? असे तुम्हला विषय वाचतांना वाटू शकेल परंतु आज हे सांगणे गरजेचे झाले आहे.
      शी/मलत्याग करताना बसण्याची स्थिती हि योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यावर बनलेला मल हा आतड्यांमधून पुढे पुढे येतो आणि मलाशयात आल्यावर आपल्याला ‘शी’ ची संवेदना होते. शी करताना मलाशय हे रिलॅक्स व त्याचा अँगल योग्य असणे महत्वाचे आहे. ज्याने मालत्याग सहज होतो व हा अँगल जर चुकीचा असेल तर जोर लावून आणि थांबत थांबत मालत्याग होतो आणि बराच वेळ बसावे लागते आणि पूर्ण शौच्चानंद मिळत नाही.

      ‘शी’ ला अनेकांना बराच वेळ बसून राहावं लागते आजच्या कमोडच्या युगात अत्यंत सुविधा दायक असा कमोड बसायला आरामदायी वाटतो.  तासन्तास पेपर वाचत काही बसलेले असतात. हि चुकीची पद्धत आहे. ह्यात शौच्चानंद मिळत नाही. उलट अर्श/पाईल्स, फिशर, इत्यादी विकार होतात.

मग योग्य स्थिती कुठली?

   भारतीय पद्धती प्रमाणे उकिडवे/ उक्कड/sqatting स्थिती हि योग्य स्थिती आहे. ह्यात मलाशयातून मल सहज बाहेर येतो आणि शौच्चानंद मिळतो. मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. आयुर्वेदसुद्धा ह्याच स्थितीचे समर्थन करते.

महत्वाचे- ज्यांना भारतीय पद्धतीत बसूनही जोर लुवून शी करावी लागते त्यांना पचना संबधीचे विकार असू शकतात, मालबद्धतेचा त्रास असू शकतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांना सुद्धा ह्या स्थितीचा फायदा होतो. परंतु जास्त त्रास असल्यास आपल्या वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

     तुम्ही अनेक आनंद ऐकले होते शौच्चानंद पहिल्यांदाच ऐकला. आदरणीय वैद्य  नाना हा शब्द वापरतात. ते बस्ती चे महत्व सांगताना ते म्हणतात ज्यांना मालबद्धतेचा त्रास आहे त्यांनाच कळू शकेल शौच्चानंद काय असतो.

   तर भारतीय पद्धतीतच बसा आणि शौच्चानंद घ्या.   

वैद्य.भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद,जळगाव 8379820693

Email-drbhushandeo@gmail.com
हि लिंक जरूर बघा

https://youtu.be/pYc3EoUiMfo

Thursday, November 10, 2016

सुधन आणि आयुर्वेद

*आयुमित्र*

*सुधन आणि आयुर्वेद*
    
     देशात काळ्या धनाची चर्चा सुरु आहे. आज बरेच लोक काळे धन पांढरे करण्याच्या रांगेत सकाळपासूनच लागले आहेत. परंतु काळेधन बदलून घेणे म्हणजे ते शुध्द होते का? व्यावहारिकदृष्ट्या कदाचित होत असाव पण अस नाही. स्वच्छ धनापेक्षा धन हे सुधन म्हणजेच योग्य मार्गाने कमाविलेले असावे.

*सुधन आणि आयुर्वेदाचा काय संबंध?*

    आयुर्वेद आचार्य चाराकांनी त्रिविध एषणा वर्णन करतांना ह्याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्याची इच्छा करावी अशा तीन एषणा वर्णन केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे *धनैषणा*. जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने आपल्याकडे असलेच पाहिजे. कायदेशीरपणे  शेती, पशुपालन, व्यापार, नौकरी यासारखी कामे करून धन मिळवावे. ज्याची निंदा कायदा व आजूबाजूचा समाज करीत नाहीत. अस जो करेल तोच खरा धनवान होईल. समाजाकडून मानसम्मान प्राप्त होईल. असे जो करीत नाही त्याच्या पदरी दुख येते. म्हणून धन असावे पण ते सुधन म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेले असावे.

  आयुर्वेदाचे हे आपल्या सामाजिक आरोग्याविषयीचे नियम आपण नक्की पळूया आणि सुधन मिळवूया.    

*वैद्य भूषण मनोहर देव.*

*ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693

http://wp.me/p7ZRKy-40

Sunday, November 6, 2016

पंचमहाभूत आणि आपले आरोग्य

     पंचमहाभूतांचे वर्णन मुख्यतः आयुर्वेद व आध्यत्मशास्त्र ह्यात आढळून येते. विश्वातील सर्व घटक हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे असे हे शास्रे म्हणतात.
     पंचमहाभूते म्हणजे नेमक काय पण? तर पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि ५ तत्वे होय.
       आयुर्वेदात ह्यांचे वर्णन आरोग्याच्या संदर्भात आले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे असे आयुर्वेद म्हणतो. पंचमहाभूतात्मक संघटन काय आहे ह्यावर  आपली प्रकृती ठरते .जे शरीरात घन तत्व आहेत ते पृथ्वीपासून तयार होतात. जसे हाडे, पेशी ई. द्रव तत्व जसे आहार रस, रक्त ई. जलापासून, उष्ण तत्व जसे काही अन्न पचन करणारे इंद्रिय व घटक हे तेजापासून, सर्वप्रकारचे वायू जसे प्राणवायू हे वायू तत्वापासून व सर्वप्रकारच्या पोकळ्या जसे पोट, अन्ननलिका, आतडे इत्यादी अवयव आकाश तत्वापासून बनतात.
       आपले शरीर, अन्न, निसर्ग हे सारे पंचमहाभूतांनी युक्तच आहे. आपले आरोग्य दीर्घकाळ टिकवायचे असेल तर ह्या पंचतत्वांचा विचार नक्कीच ह्यायला हवा. जलोदर झालेल्या व्यक्तीने अधिक जल सेवन करीत राहणे घातक ठरते आणि ह्या उलट वारंवार अतिसार झालेल्या व्यक्तीने पाणी न पिणे हे घातक सिध्द होते. प्रत्येक व्यक्तीत हि तत्वे कमी जास्त प्रमाणात असतात(आपल्या प्रकृती नुसार) म्हणून विचार पूर्वक आहार घेणे व विहार करणे महत्वाचे ठरते.
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद 
जळगाव
 8379820693

Friday, November 4, 2016

गुरु आहार आणि लघु आहार

     गुरु आहार हा शब्द वाचल्यावर आपल्याला वाटेल गुरुना द्यायचा आहार, काहींना वाटेल गुरुवारी घ्यायचा आहार म्हणजे गुरु आहार असावा. पण असे काही नसून गुरु आणि लघु हे आहाराचे प्रकार आहेत चरकाचार्यांनी(च.सु.५/५/) वर्णन केलेले आहेत.
      आहर घेतांना कुठला आहार आपण घ्यावा ह्याचे तारतम्य आपण स्वतः बाळगायला हवे. म्हणजे दीर्घकाळ निरोगी राहायला मदत होते. ह्यासाठीच ह्या प्रकारांचे वर्णन. गुरु आहार म्हणजे पचायला जड असा आहार. जसे गुळ, साखर, बासुंदी, श्रीखंड, मांस, उडीद असे महागडे पदार्थ(खिचाला आणि पचायला) गुरु पदार्थांच्या श्रेणीत येतात. तर मुग, लाह्या, इत्यादी पचायला हलके पदार्थ लघु ह्या श्रेणीत येतात. गुरु आहार हा पचनशक्ती कमी करणारा असतो, तर लघु आहार पचन वाढवणारा असतो. गुरु आहार वजन वाढविणारा असतो तर लघु आहार वजन कमी करायला मदत करणारा असतो.
     गुरु आणि लघु किती घ्यायचा आहार हे आपली पचन शक्ती कशी आहे ह्यावर ठरवावे. ज्यांची भूक चांगली आहे, रोज व्यायाम/श्रम करतात, अश्या व्यक्तीने गुरु, लघु आहाराची चिंता करण्याचे कारण नाही. ज्यांची पचन शक्ती चांगली नाही त्यांनी गुरु आहार घेतांना सावधान. प्रमेह, स्थौल्य आहे अशा व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन गुरु लघु आह्राची योजना करावी.  आता हिवाळा आहे भूक/पचनशक्ती चागली असते स्वस्थ व्यक्तीने गुरु आहार घ्यायला हरकत नाही.
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद,
 जळगाव 
8379820693

हिवाळा आणि सुका मेवा

हिवाळा  आणि सुका मेवा

दिवाळी  संपली  आणि  या  वर्षी  लगेच थंडीची  चाहूल लागली  .रात्री थोडं गार  वाटायला  लागलंय असं  म्हणेपर्यंत पहाटे चांगलाच  गारवा जाणवू लागला आहे .धुकं पडायला लागलंय आणि शेकोट्या ही पेटायला लागल्या  आहेत .हळूहळू शरद ऋतू संपून आपली वाटचाल हेमंत ऋतूकडे व्हायला लागली आहे .आता दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार .
ह्या ऋतू बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होतंच असतो .शरीर हवेतील बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते ,जर हे बदल वेळीच ओळखून आपण शरीराला मदत केली  तर  आजारपण येत नाही .
जेव्हा हवा फार उष्ण असते तेव्हा आपल्याला घाम  येतो  आणि त्या द्वारे शरीर  स्वतःचे तपमान कमी  करून  शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करते .याच्या विरुद्ध घटना थंड हवामानात घडते .बाहेर भरपूर गारवा असताना शरीराचे तापमान  टिकवून  ठेवण्याचा शरीर प्रयत्न करत असते .यासाठी शरीराची रंध्रे बंद केली जातात ,घाम येत नाही आणि उष्णता शरीरात रोखून धरली जाते .याचाच दुसरा परिणाम म्हणून शरीराचा जाठराग्नी म्हणजेच पचनशक्ती संधुक्षित होते म्हणजेच वाढते .भूक चांगली लागू लागते .मुख्य म्हणजे शरीराचे बल वाढवण्याचा हा काल आहे .याला आयुर्वेदात विसर्ग काल  असे म्हटले जाते .याचा अर्थ शरीराची ताकत वाढवण्यासाठी या काळात निसर्गाकडून शरीराला साथ मिळते .उन्हाळ्याच्या दिवसात आपण लवकर थकतो ,आपली energy level टिकत नाही पण हिवाळ्यात आपला उत्साह ,शक्ति टिकून राहू शकते .म्हणूनच या दिवसात भरपूर खावे आणि भरपूर व्यायाम करावा असे म्हटले जाते .यालाच Healthy season असेही म्हटले जाते ,कारण या दिवसात आपोआपच आजारपणे कमी होतात कारण हवा स्वच्छ असते ,जीवजन्तुंचे प्रमाण कमी असते .पुढे येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीने ताकत कमवायची  असेल तर सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवे ते आहारावर !
याच विचाराने आपल्याकडे हिवाळ्यात विशेष पौष्टिक आहार घेण्याची पद्धत  आहे जी अतिशय योग्य आहे .बलवर्धक  आणि शरीर स्निग्ध राहण्याच्या  दृष्टीने सर्वात चांगला आहार कोणता असेल तर तो म्हणजे सुका मेवा !
आपल्याकडे थंडीत लाडू करण्याची पद्धत आहे .काजू ,बदाम ,पिस्ते ,खोबरं ,खारीक ,खसखस ,डिंक ,मेथ्या असे विविध पदार्थ वापरून ,साजूक तूप आणि गूळ वापरून हे लाडू  तयार केले जातात .यातील बहुतेक सगळे पदार्थ हे स्निग्ध गुणाचे आहेत आणि पौष्टिक आहेत .हिवाळ्यात हवेत कोरडेपणा वाढतो आणि तसाच तो  शरीरातही वाढतो .त्वचा कोरडी होते ,टाचा फुटतात ,डोक्याची त्वचा कोरडी होऊन कोंडा होतो .त्वचेची स्निग्धता टिकवायची असेल तर बाहेरून स्निग्ध गोष्टी पुरवणे गरजेचेच आहे आणि त्यासाठीच या लाडूंची योजना आहे .सगळा सुका मेवा आणि त्यात तूप ,गूळ मिसळल्यामुळे शरीराला लागणारी उर्जा भरपूर प्रमाणात पुरवली जाते आणि ती शरीरात साठवली जाते .
हे लाडू विशेषकरून लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी फार उपयोगी आहेत .फक्त ते खाताना काही नियम पाळणे आवश्यक आहे .हे लाडू बांधताना रवा ,बेसन लाडू सारखे मोठे बांधू नयेत कारण यातील सगळे घटक पौष्टिक असले तरी त्याचवेळी ते पचायला जडही असतात त्यामुळे एकावेळी फार मोठा लाडू खाल्ला तर पचनशक्तीवर ताण येऊ  शकतो म्हणून बेताच्या आकारातच लाडू बांधावे .सकाळी चांगली भूक लागलेली असताना ,उपाशीपोटी हा लाडू खावा .लाडू खाल्ल्यानंतर किमान दोन तास काहीही खाऊ नये .खास करून लहान मुले आवडला म्हणून एकावेळी जास्त लाडूची मागणी करू शकतात पण तरीही हे पथ्य अवश्य पाळावे .
ज्यांना डायबेटीस मुळे गोड खाण्यावर बंधन आहे त्यांना हाच लाभ मिळावा म्हणून गूळ सोडून इतर मेवा आणि त्यात खजूर मिसळून लाडू करता येतात किंवा सुक्या मेव्याची पावडर करून ती दुधाबरोबर घेतली तरी हे फायदे मिळू शकतात .

वैद्य राजश्री कुलकर्णी
M .D .( आयुर्वेद )
आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल
स्वामी समर्थ केंद्राजवळ
रथचक्र सोसायटी मागे
इंदिरानगर ,नाशिक ९
फोन : (०२५३ ) २३२२१००

Thursday, November 3, 2016

#डायटिंग_व_क़्वाड्रायटिंग

#डायटिंग_व_क़्वाड्रायटिंग
    डायटिंग हा शब्द आपल्या करिता काही नवीन नाही. वजन, पोट, साखर, चरबी, कोलेस्तेरोल वे वाढले कि आपली डायटिंग सुरु होते. मग कोणी कडक उपास, गोड बंद, तेल तूप बंद इत्यादी प्रकार सुरु होतात. डायटिंग हा आधुनिक शास्त्राचा कन्सेप्ट आहे. डायटिंग म्हणजेच डाय म्हणजे दोनदा आणि इटिंग म्हणजे खाणे(मी लावलेला अर्थ). दिवसातून दोनदाच पोटभर खाणे आणि दिवसभर काहीही न खाणे म्हणजे डायटिंग.
#क़्वाड्रायटिंग
आपण किती वेळा खावे आणि किती खावे?
     ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नाही. उदा. ज्याचा अग्नी म्हणजे पचनशक्ती चागली आहे, तरुण आहे, हिवाळा हा ऋतू आहे, नित्य व्यायाम करणारा आहे, दिवसाची वेळ आहे असा व्यक्ती आहाराची मात्रा जास्त घेत असेल व चार वेळा जेवत असेल तरी त्याला त्रास होणार नाही. परंतु ह्याच्या उलट मंदाग्नी, वृध्द, पावसाळा, व्यायाम अभाव, रात्रीची वेळ अश्या व्यक्तीने जास्त मात्रेत आहार घेत असेल व चार वेळा खात असेल तर  नक्कीच त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुर्वेद सागते कि प्रत्येकाने आपले वय, प्रकृती, पचन शक्ती, व्यायम/बल , प्रदेश, ऋतू, वेळ ह्या नुसार आहार कमी जास्त मात्रेत घेणे अपेक्षित आहे.
        परंतु स्वास्थ्य व्यक्तीसाठी क़्वाड्रायटिंग योग्य ठरते. सकाळी पोटभर जेवण, दुपारी थोडा नाश्ता, संध्यकाळी हलके जेवण व रात्री परत थोडे दुध किवा एखादे फळ असे चार वेळेस स्वास्थ्य व्यक्तीने आहार घेण्यास हरकत नाही.
(टीप- क़्वाड्रायटिंग हे नवीन नामकरण मी चार वेळा खाणे ह्या अर्थाने केलेले आहे.)
  
     वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती अयुर्वेद, 
जळगाव
 8379820693

ऊसाचा रस

🍀  ऊसाचा रस  ☘

अविदाही कफकरो वातपित्तनिवारणः|
वक्त्रप्रह्लादनो वृष्यो दन्तनिष्पीडितो रसः ||

दातांनी चावुन खालेला उसाचा रस कफवर्धक, वातपित्तनिवारण करणारा, तोडांत प्रसन्नता उत्पन्न करणारा, बलवर्धन करणारा आहे.
        ऊसाला दातांनी चावुन खाणे निसर्गाला अपेक्षीत आहे म्हणजे ऊस खाण्यापासुन अपेक्षीत लाभ मिळतात.

यंत्रातुन काढलेला ऊसाचा रस

गुरूर्विदाही विष्टम्भी यान्त्रिकस्तु प्रकीर्तितः ||
        यंत्रातुन काढलेला ऊसाचा रस पचावयास जड, विदाहकारक ( जळजळ निर्माण करणारा व उशीराने पचन होणारा), शरीरातुन मल बाहेर पडण्यास अवरोध करणारा असतो.
               यंत्रातुन रस काढल्याने चावण्याचे कष्ट घ्यावे लागत नाही पण उसाच्या रसाचे गुणधर्म पुर्ण बदलतात. उसाच्या रसात मीठ, बर्फ आदी इतर पदार्थ टाकल्याने उसाचा रस अधिकच विदाहकारक मलमुत्राचा अवरोध करणारा बनतो.

शिजविलेला ऊसाचा रस 🔥

पक्वो गुरूः सरः स्निग्धः सतीक्ष्णः कफवातनुत्||

अग्निसंस्कारित ऊसाचा रस पचावयास जड, शरीरात पसरणारा, स्निग्ध (स्नेहयुक्त), तीक्ष्ण, कफवात कमी करणारा असतो.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob - 9028562102, 9130497856

Wednesday, November 2, 2016

भोजन केव्हा करावे?

  जेवण केव्हा करावे? 
     हा प्रश्न आपल्याला केव्हा पडतो तर, जेव्हा वजन वाढलेले असते, डायटिंग करायची असते, डायबेटीस झालेला असतो किवा थोडक्यात आरोग्यविषयक ताक्रारी वाढतात तेव्हा हा प्रश्न पडतो. जिज्ञासेपोटी, आरोग्याची काळजी म्हणून, त्यामागील विज्ञान जाणून घ्यायच म्हणून असा प्रश्न आम्हाला कोणी विचारेल ऐसा नर दुर्लभच.
               सकाळी उशिरा उठणे, रात्री फार वेळ जगणे, उशिरा घरी येणे ह्या आजच्या चाली रिती आहेत. त्यामुळे अवेळी जेवण हि प्रथा रूढ होते आहे. अवेळी, भूक नसताना, अप्रसन्नचित्त असताना जेवण करणे अपेक्षित नाही हे अन्न आपल्याला पोषक ठरणार नाही.
   मग जेवायचं केव्हा?
  • त्या दिवशी आंघोळ स्वतःची आंघोळ झालेली हवी( भूक चांगली लागते)
  • आंघोळी आधी काहीही खाऊ नये.(अन्न नित पचत नाही)
  • आधी खाल्लेला आहार पचला आहे का? ह्याची खात्री करून घ्यावी.(भूक लागलेली असणे हि खात्री)
  • सूर्योदयानंतर , सुर्योदयापूर्वी ( अन्नपचन चांगले होते.)
  • आपली खरी भूक ओळखून जेवणाच्या वेळा फिक्स करणे.(वेळ झाली म्हणून न जेवता भूक लागली तेव्हा जेवणे म्हणजे खरी भूक)
जेवणाच्या वेळा पाळणे खूप महत्वाचे आहे ह्याने आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर राहता येईल. “किती जेवावे” हा विषय लवकरच लिहील.
 © वैद्य भूषण मनोहर देव.
 ज्योती अयुर्वेद
जळगाव 
8379820693




   

Visit Our Page