Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 23, 2016

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

#आयुमित्र

मेंटल जिम, आयुर्वेद आणि आरोग्य

       मेंटल जिम? हा काय नवीन प्रकार बर आता? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जिम म्हणजे निरोगी रहाण्यासाठी शारीरक कसरत करण्याचे एका बंदिस्त ठिकाण. शरीर निरोगी राहण्यासाठी जसे जिम आहे, त्याच प्रमाणे मन सुदृढ रहाण्यासाठी सुद्धा मेंटल जिम असते. ती कशी ते बघूया.

मेंटल जिम आणि आयुर्वेदीय धारणीय वेग

दैनंदिन जीवनात बरेच अस प्रसंग येतात जिथे आपल्याला चीड येते, राग येतो, लोभ होतो, ईर्षा होते अश्या वेळी आपण त्याठिकाणी त्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. ह्यामुळे अशांती, निराशा, ताण आपल्याला येत असतो. आयुर्वेद म्हणते कि लोभ, शोक, भय, क्रोध/राग, अहंकार, निर्लज्जता, ईर्षा, आसक्ती, दुसरयाचे धन मिळविण्याची इच्छा ह्या मनाच्या वेगाचे आडविण्याची कसरत आयुर्वेदाने करायची सांगितली आहे. ह्या मेंटल जिम मुळे मनाच्या पेशी अधिक मजबूत होतात आणि मन निरोगी राहते.

ज्यांना काही आजार आहेत, विशेषतः स्थौल्य, डायबेटीस, आम्लपित्त इत्यादी कि ज्यामध्ये पथ्य पाळणे महत्वाचे असते. बऱ्याच पदार्थ्र ऑफर केल्यावर आपल्याला नाही म्हणता येत नाही, जसे स्वीट्स, आईसक्रिम, फास्टफूड, कोल्डड्रिंक्स अश्यावेळी सुद्धा मेंटल जिम उपयोगी पडते. मनाला नाही म्हणण्याची कसरत आपण केली तर बरेच आजार आपण दूर ठेवू शकतो.

चला तर, शरीर व मनाला निरोगी ठेवूया आणि मेंटल जिम करूया.  

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693

drbhushandeo@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page