Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, December 5, 2016

शरीरातील काळेधन आणि आयुर्वेद

   
*आयुमित्र*
*शरीरातील काळेधन आणि आयुर्वेद*

  स्वस्थ शरीर हे आपले धनच आहे. म्हणून ‘हेल्थ इज वेल्थ’ असे म्हणतात. आजकाल काळ्याधनाची चर्चा संपूर्ण भारतात होते आहे. ह्याच निमित्याने शरीरातील काळ्याधनाची चर्चा करणे सुद्धा आज गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा लेख.   

*माझ वजन का वाढतंय?*

      आज हा प्रश्न अनेकांना पडतों आहे. कारण, स्थूलता ह्या रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ह्यातूनच डायबेटीस, बिपी, लखवा, वंध्यत्व इत्यादी आजार होत आहेत. स्थौल्यता हा आजार संपूर्ण जागासमोर एक आव्हान म्हणून पुढे येतो आहे. स्थौल्यता कमी करणे फार कठीण आहे असे अनेकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून दिसून आले आहे. परंतु संकल्प असल्यास निश्चितच करता येते. मुकेश अंबानीचे सुपुत्र व आमिर खान ह्यांची उत्तम उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आपण सुद्धा निश्चितच करू शकतो.

*स्थौल्यता/वजन कसे वाढते बर?*

          आधुनिक शास्त्र असे सांगते कि, आपण दररोज आपल्या शरीराला गरज असेल तेव्हडेच अन्न घेतले पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त घेतल्यास ते चरबीच्यारूपाने शरीरावर साचून राहते. हि चरबी म्हणजे शरीराचे काळेधनच आहे. पैसा कमविला पाहिजे पण त्याचा टॅक्स/कर चुकविला पाहिजे म्हणजे न रेड ची भीती ना सर्जिकल स्ट्राईकची भीती. तसेच, जेवढे अन्नरुपी उर्जा घेतो आहे तेव्हडी वापरा आणि व्यायामरुपी टॅक्स/कर दररोज चुकवा नाहीतर चरबी रुपी काळेधन शरीरात जमा होईल आणि एकदिवस अटॅक येईल आणि बायपाससर्जरी करण्याची वेळ येईल. 

*आयुर्वेद काय सांगते?*

      आयुर्वेद म्हणते कि, अधिक मात्रेत आहार घेतल्याने, जड, गोड, थंड, तेलकट/तुपकट अन्न जास्त खाल्याने, व्यायाम न केल्याने, दिवसा झोपल्याने, सदैव चिंता रहित राहिल्याने व अनुवांशिक कारणाने स्थौल्याता हा रोग होतो.

*वजन कमी करण्यसाठी काय करावे?*

   काही उपाय आहेत जे प्रत्येक स्थूल व्यक्ती करू शकतो म्हणजे आपल्या शक्तीनुसार व्यायाम करणे. आहार काय घ्यावा? कॅलेरीज किती घ्यायच्या? किती वेळ जेवायचे? ह्याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी सारखे नाहीत. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार व व्यायामाचे नियोजन करावे. 

चला तर आपले शरीरातील चरबीरुपी काळेधन कमी करूया आणि स्वस्थ राहूया. 

  *-वैद्य भूषण मनोहर देव
ज्योती आयुर्वेद,
जळगाव
8379820693/7588010703*

drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-52

No comments:

Post a Comment

Visit Our Page