Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 29, 2016

बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*
*बस्ती, वाताचे आजार आणि आपले आरोग्य*    

     बस्ती हि आयुर्वेदातील एक श्रेष्ठ चिकित्सा आहे. आयुर्वेदीय पंचकर्मात बस्तीला फार महत्व आहे. वाताच्या विकारावर बस्ती रामबाण अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदातील सर्व आचार्य, संहिता बस्तीच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात. औषधी काढा किंवा औषधी तेल वापरून बस्ती दिला जातो. सामन्य भाषेत ह्याला एनिमा म्हणतात. पण बस्तीला एनिमा म्हणणे योग्य नाही कारण बस्तीचे फायदे आणि उपक्रम त्याहून खूप वेगळे आहेत.

      बस्ती चिकित्सा वातविकार म्हणजे संधीवात, कंपवात, मांसपेशीगत वात( मस्कुलर पेन), सर्वप्रकारच्या वेदना डोके दुखी, पोटदुखी, मासिकपाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी इत्यादी अनेक वेदनाशमन करण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. एव्हडच नव्हे तर स्थौल्यता कमी करण्यासाठी लेखन व कर्षण बस्ती, गर्भाशयाच्या विकारांसाठी उत्तर बस्ती, हाडांची झीज भरून काढण्यासाठी तिक्तक्षीर बस्ती केला जातो. साधे पोट साफ होत नसेल तर बस्ती फार उपयोगी आहे. अश्या अनेक विकारांसाठी बस्ती चिकित्सा केली जाते. जानू(गुडघे) बस्ती, कटी(कंबर) बस्ती, मन्या(मान) बस्ती, हृदय बस्ती इत्यादी बस्तीचे काही प्रकार आहेत जे त्या ठिकाणच्या वेदना/विकार कमी करतात.

      एकदा बस्ती घेतलेला व्यक्ती जेव्हा पुन्हा भेटून हे विचारतो- डॉक्टर आज पोट साफ नाही झाले बस्ती देता का?, डॉक्टर बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? डॉक्टर पिरेड येणार आहेत पोट दुखी सुरु व्हायच्या आत बस्ती घ्यायचा आहे कधी येऊ? तेव्हा मनात आयुर्वेदाबाद्दलचा अभिमान अजून उंचावतो. धुळ्याला आदरणीय वैद्य.नाना ह्याच्या कडे आयुर्वेदाचे प्रात्यक्षिक शिकण्याचा योग आला.  बस्तीचा उल्लेख आल्यावर ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत *बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवीचा विसावा* तुम्ही स्वतः बस्ती घ्या आणि रुग्णांनासुद्धा द्या.

सध्या पंचकर्माचे रुग्ण वाढले आहेत. हिवाळ्याचा ऋतू आणि त्यात स्नेहन, स्वेदन करण्याचा मजा वेगळाच असतो. आनंद देणारी प्रक्रिया आणि आरोग्याचे इतके फायदे करून देणारी चिकित्सा पंचकर्माशिवाय कोणती असेल बर?

चला तर  पंचकर्म करूया, बस्ती घेऊया आणि  आनंदी व  निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5A

No comments:

Post a Comment

Visit Our Page